मराठी बातम्या /बातम्या /मनी /

नोकरी गेल्यावरही टेन्शन नाही जॉब इन्शुरन्स आहे ना! कसा करायचा क्लेम

नोकरी गेल्यावरही टेन्शन नाही जॉब इन्शुरन्स आहे ना! कसा करायचा क्लेम

भारतात जॉब लॉस इन्शुरन्स कव्हर विमा इंडस्ट्रीतील लेटेस्ट प्रॉडक्ट आहे.

भारतात जॉब लॉस इन्शुरन्स कव्हर विमा इंडस्ट्रीतील लेटेस्ट प्रॉडक्ट आहे.

भारतात जॉब लॉस इन्शुरन्स कव्हर विमा इंडस्ट्रीतील लेटेस्ट प्रॉडक्ट आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : महागाई सातत्याने वाढत आहे, अशातच अनेक कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत, त्यामुळे नोकरदार मंडळी नोकरी जाण्याच्या अनिश्चिततेसह जगत आहेत. मागणी कमी झाल्याने अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना काढलंय.

पाश्चिमात्य आणि युरोपीय देशांमध्ये मंदी आल्याचं म्हटलं जातंय. अनेक भारतीय लोकांच्या नोकऱ्या गेल्यात, तर काहींच्या संकटात आहेत. अशा परिस्थितीत नोकरीच्या सुरक्षिततेबद्दल शंका असेल, तर जॉब लॉस इन्शुरन्स कव्हर घेणं फायद्याचं ठरू शकतं. या संदर्भात ‘एबीपी लाइव्ह’ने वृत्त दिलंय.

कसं मिळतं जॉब लॉस कव्हर

भारतात जॉब लॉस इन्शुरन्स कव्हर विमा इंडस्ट्रीतील लेटेस्ट प्रॉडक्ट आहे. पण फक्त जॉब लॉस कव्हर कोणतीच विमा कंपनी ऑफर करत नाही. पण गंभीर आजारासाठी घेतलेल्या विमा कव्हर किंवा होम लोन प्रोटेक्शन प्लॅनसोबत हे कव्हर अॅड-ऑन प्लॅन म्हणून मिळतं.

तसंच हे फक्त पगार मिळणाऱ्यांसाठीच आहे. एखाद्या व्यक्तीची नोकरी गेल्यास जॉब इन्शुरन्सने एन्श्युअर्ड व्यक्तीला आर्थिक मदत मिळते.

तुमच्यावर कर्ज असेल, तुम्ही आधीच EMI भरत असाल आणि EMI भरण्यासाठी उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्रोत नसेल तेव्हा जॉब लॉस कव्हरचा लाभ मिळतो. विमा कंपनी तीन महिन्यांचा ईएमआय भरते. या कालावधीत पॉलिसीधारकाला नवीन नोकरी शोधावी लागते.

Paytmवरून चुटकीसरशी इतर खात्यात पाठवता येणार पैसे, पाहा कसे पाठवयाचे पैसे?

जॉब लॉस इन्शुरन्स कव्हरची फीचर्स कोणती?

जॉब लॉस इन्शुरन्स कव्हरचा फायदा नोकरी जाण्याच्या कारणांवरून ठरवला जातो. नोकरी गमावण्याच्या शक्यतांच्याआधारे जॉब लॉस इन्शुरन्स कव्हरची प्रीमिअम अमाउंट ठरवली जाते. एकूण कव्हरेज प्लॅनच्या 3 ते 5 टक्के रक्कम तुमच्या जॉब लॉस इन्शुरन्स कव्हरचे प्रीमिअम भरण्यासाठी केली जाते. हे मुख्य पॉलिसीपेक्षा वेगळं असतं. जर जॉब लॉस इन्शुरन्स कव्हर होम लोन प्रोटेक्शन प्लॅनसोबत घेतलं असेल तर पॉलिसीची एकूण मुदत 5 वर्षांची असते. पूर्ण होम लोनच्या काळात इन्शुरन्सचा फायदा होत नाही.

खुशखबर! ATM मधून 1 लाखापर्यंत काढता येणार पैसे, 'या' बँकेनं सुरू केली सेवा

फायदा केव्हा मिळत नाही?

जॉब लॉस इन्शुरन्समध्ये मर्यादित फायदा मिळतो. अनेक कंपन्या नेट इन्कमच्या 50 टक्के देते. जेव्हा कंपनी एखाद्या व्यक्तीला चांगली कामगिरी न केल्याने किंवा प्रोबेशन पीरियडमध्ये नोकरीवरून काढते, तेव्हा जॉब लॉस इन्शुरन्स कव्हर मिळत नाही. सविस्तर जाणून घेऊयात.

1. सेल्फ एंप्‍लॉइड किंवा बेरोजगार असल्यास

2. प्रोबेशन पीरियडमध्ये बेरोजगार झाल्यास

3. लवकर रिटायरमेंट घेतल्यास किंवा राजीनामा दिल्यास

4. तुमच्या आजारामुळे नोकरी गेल्यास

5. सस्पेंड, कर्मचारी कपात, अंडरपरफॉर्म किंवा फ्रॉड केल्याने कामावरून काढल्यास जॉब लॉस कव्हर मिळत नाही.

या कंपन्या देतायत जॉब लॉस कव्हर

भारतीय विमा मार्केटमध्ये स्टँडअलोन जॉब लॉस इन्शुरन्स कव्हर कोणत्याही विमा कंपनीद्वारे ऑफर केलं जात नाही. हे अॅड-ऑन, अॅक्सिडंट पॉलिसी किंवा गंभीर आजारांवरील योजनेसह उपलब्ध आहे. या पैकी काही प्लॅनसह जॉब लॉस कव्हर मिळतात. एचडीएफसी होम सुरक्षा प्लॅन, रॉयल सुंदरमचा सेफ लोन शील्ड, आयसीआयसीआय लोम्‍बार्डचा सिक्युअर माइंड हे प्लॅन जॉब लॉस इन्शुरन्स कव्हर ऑफर करतात.

First published:

Tags: Career, Insurance