Jio ने दूरसंचार मंत्र्यांना लिहिलं पत्र, 'कंपन्यांना बेलआउट पॅकेजची गरज नाही'

टेलिकॉम क्षेत्रातली मोठी कंपनी असलेल्या Jio ने दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्र लिहिलं आहे. टेलिकॉम कंपन्यांना बेल आउट पॅकेजची गरज नाही, असं कंपनीने लिहिलेल्या या पत्रात म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 31, 2019 06:21 PM IST

Jio ने दूरसंचार मंत्र्यांना लिहिलं पत्र, 'कंपन्यांना बेलआउट पॅकेजची गरज नाही'

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर : टेलिकॉम क्षेत्रातली मोठी कंपनी असलेल्या Jio ने दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्र लिहिलं आहे. टेलिकॉम कंपन्यांना बेल आउट पॅकेजची गरज नाही, असं कंपनीने लिहिलेल्या या पत्रात म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, टेलिकॉम कंपन्यांकडून पेनल्टी वसूल केली जावी, असंही Jio ने नमूद केलं आहे.

COAI टेलिकॉम क्षेत्राची प्रतिनिधी नाही

Jio ने दूरसंचार मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे, सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (COAI)दूरसंचार उद्योगाची प्रतिनिधी नाही. त्यामुळे COAI ची मागणी फेटाळून लावण्यात यावी. COAI धमकी देऊन ब्लॅकमेल करते आहे. ही संघटना फक्त दोन ऑपरेटर्सचं हित पाहतेय.

Jio ने म्हटलं आहे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार या कंपन्यांकडून पेनल्टीची रक्कम वसूल केली जावी. सुप्रीम कोर्टाने AGR प्रकरणी दूरसंचार विभागाच्या बाजूने निर्णय दिला होता. सुप्रीम कोर्टाने सरकारला दोन टेलिकॉम कंपन्यांकडून 92 हजार कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते.

Loading...

(हेही वाचा : उद्यापासून बदलणार बँकांचे नियम, तुमच्यावर होणार थेट परिणाम)

Jio चा COAI वर आरोप

Jio ने COAI ने दूरसंचार विभागाला लिहिलेल्या पत्राला उत्तर देताना म्हटलं आहे की, टेलिकॉम क्षेत्र संकटात नाही. COAI ने दूरसंचार विभागाला लिहिलेल्या पत्रात Jio चं मत समाविष्ट केलेलं नाही. COAI ही एक औद्योगिक संघटना नाही तर दोन प्रमुख टेलिकॉम कंपन्यांचं मुखपत्र आहे.

======================================================================================

VIDEO: सत्तास्थापनेच्या वक्तव्यावरून खासदार संजय राऊत यांचा यू-टर्न, म्हणाले...

<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-416505" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/NDE2NTA1/"></iframe>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 06:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...