खूशखबर! Jio चा सगळ्यात परवडणारा 'ऑल इन वन प्लॅन'

खूशखबर! Jio चा सगळ्यात परवडणारा 'ऑल इन वन प्लॅन'

1 डिसेंबरपासून मोबाइलचे दर वाढले आहेत. पण Jio ने त्यांचा सगळ्यांना परवडेल असा एक प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये 300 टक्के फायदा असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

  • Share this:

मुंबई, 4 डिसेंबर : 1 डिसेंबरपासून मोबाइलचे दर वाढले आहेत. पण Jio ने त्यांचा सगळ्यांना परवडेल असा एक प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये 300 टक्के फायदा असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हा प्लॅन 6 डिसेंबर 2019 पासून ग्राहकांसाठी उपलब्ध असेल.त्यामुळे आता अनेक ग्राहकांची मदार याच प्लॅनवर असेल. जागतिक दर्जाची मोबाइल सेवा स्वस्त दरात देण्याचा Jio चा मानस आहे. हा प्लॅन Jio च्या सगळ्या सेंटर्समधून घेता येईल.

Jio ची 4 G सेवा अत्याधुनिक आहे. त्यातच भविष्यात येणाऱ्या तंत्रज्ञानासाठीही ही कंपनी सज्ज आहे. ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. vodafone, idea, airtel या सगळ्याच कंपन्यांनी मोबाइलच्या दरात चांगलीच वाढ केली आहे. हे दर सुमारे 45 टक्क्यांनी वाढले आहेत. असं असलं तरी ग्राहकांना परवडेल अशा पद्धतीने सेवा देण्याचा Jio चा प्रयत्न आहे.1 डिसेंबरपासून मोबाइलच्या दरात बदल झालेत. मोबाइलसोबत इंटरनेटचा वारपरही महाग होणार आहे. टेलिकॉम क्षेत्रावर कर्जाचा बोजा आहे. त्यामुळे कंपन्यांनी ही दरवाढ केलीय.

(हेही वाचा : 2 हजार रुपयांच्या नोटा बंद होणार का? मोदी सरकारने दिलं हे उत्तर)

असे असतील दर

Jio चा हा प्लॅन मोबाइल कॉल आणि इंटरनेटच्या वापरासाठी खूपच फायदेशीर आहे. एक महिन्यासाठी आता 199 रु. 2 महिन्यांसाठी 399 रुपये, 3 महिन्यांसाठी 555 रु तर एक वर्षासाठी 2 हजार 199 रु. दर असेल. अनलिमिटेड कॉल्स आणि वापरासाठी 1 हजार रुपयांपासून ते 12 हजार रुपयांचा दर आहे. मोबाइल दरवाढीच्या या दिवसांत हा 300 टक्के फायदा मिळवून देणारा प्लॅन घेण्यासाठी सगळेच ग्राहक उत्सुक आहेत.

===============================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: JIOmoney
First Published: Dec 4, 2019 09:04 PM IST

ताज्या बातम्या