मराठी बातम्या /बातम्या /मनी /

करोडपतीने घेतला ट्विटर फॉलोअर्सना 65 कोटी रुपये देण्याचा निर्णय

करोडपतीने घेतला ट्विटर फॉलोअर्सना 65 कोटी रुपये देण्याचा निर्णय

या बिझनेसमनकडे त्यांची वैयक्तिक संपत्ती 2 अब्ज डॉलर्सची आहे. आपल्याकडे पैसे वाटण्यासाठी रिकामा वेळ आहे, असं ते म्हणतात. नागरिकांना कोणतंही काम न करता एक ठराविक रक्कम मिळाली तर त्याला बेसिक इनकम म्हणता येईल, असं त्यांचं म्हणणं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 12 जानेवारी : जपानचे अब्जाधीश युसाकु मीजावा त्यांना ट्विटरवर फॉलो करणाऱ्यांना कोट्यवधी रुपये देणार आहेत. ज्या फॉलोअर्सनी त्यांच्या 1 जानेवारीचं ट्वीट रिट्वीट केलं होतं त्यातल्या 1 हजार लोकांना ते 10 लाख येन म्हणजे सुमारे साडेसहा लाख रुपये देतील. त्यांच्या मते, हा एक गंभीर सामाजिक प्रयोग आहे. पैसा मिळाल्यामुळे लोक आनंदी होतात का हे तपासण्याच्या उद्देशाने हा प्रयोग करण्यात येणार आहे. या प्रयोगाला त्यांनी बेसिक इनकम आयडियाशी जोडलं आहे. अर्थतज्ज्ञांचं म्हणणं काय? असं असलं तरी जपानी अर्थतज्ज्ञ तोषीहीरो नागाहामा यांचं म्हणणं यापेक्षा वेगळं आहे. ते म्हणतात, बेसिक इनकमचा अर्थ नियमितपणे मिळणारे पैसे असा आहे. यामुळे लोकांना सुरक्षित वाटतं. पण मिजावा जे देतायत ते यापेक्षा वेगळं आहे. आपल्या ट्विटर फॉलोअर्सचा सर्व्हे करून काही निष्कर्ष काढण्यात येणार आहे. मिजावा यांनी याआधीही आपल्या 100 फॉलोअर्सना 10 कोटी येन देण्याची घोषणा केली होती. त्यांनी त्यांचा ऑनलाइन फॅशन बिझनेस Zozo Inc सॉफ्ट बँकेला 90 कोटी डॉलर्सना विकल्यानंतर त्यांनी ही ऑफर केली होती. (हेही वाचा : Aadhaar मध्ये मोबाइल नंबर आणि ई मेलचं व्हेरिफिकेशन झालं सोपं, या अ‍ॅपने होईल काम) कोण आहेत मिजावा ? युसाकु मिजावा हे एक अवलिया व्यक्ती आहेत. त्यांनी स्पेस एक्स विमानात बसून अंतरिक्षयात्राही केली होती. त्यांना स्पोर्ट्स कार आणि पेंटिंग्जचा शौक आहे. मिजावा यांचे सध्या ट्विटरवर 65 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यांची वैयक्तिक संपत्ती 2 अब्ज डॉलर्सची आहे. आपल्याकडे पैसे वाटण्यासाठी रिकामा वेळ आहे, असं ते म्हणतात. नागरिकांना कोणतंही काम न करता एक ठराविक रक्कम मिळाली तर त्याला बेसिक इनकम म्हणता येईल, असं त्यांचं म्हणणं आहे. =======================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Money, Twitter

    पुढील बातम्या