फक्त अडीच लाख रुपयांत सुरू करा हा बिझनेस, मोदी सरकार करणार मदत

फक्त अडीच लाख रुपयांत सुरू करा हा बिझनेस, मोदी सरकार करणार मदत

तुम्हाला जर नवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. केंद्र सरकार स्वस्त दरात औषधांची विक्री करणारं मेडिकल स्टोअर सुरू करण्यासाठी अडीच लाख रुपयांची मदत करतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 जानेवारी : तुम्हाला जर नवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. केंद्र सरकार स्वस्त दरात औषधांची विक्री करणारं मेडिकल स्टोअर सुरू करण्यासाठी अडीच लाख रुपयांची मदत करतं.देशभरात आतापर्यंत साडेपाच हजारांपेक्षा जास्त जनऔषधी केंद्रं सुरू झाली आहेत.सामान्य माणसांचा औषधांवर खर्च होऊ कमी व्हावा यासाठी मोदी सरकारने 2015 मध्ये प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना सुरू केली.

दुर्गम भागातल्या लोकांना स्वस्त औषधं पुरवणं हा त्यामागचा उद्देश होता. जनौषधी केंद्रांमध्ये औषधं 90 टक्क्यांनी स्वस्त मिळतात. देशभरात आतापर्यंत 5 हजार 500 जनौषधी केंद्र सुरू झालीयत.

सरकारने या जनऔषधी केंद्रात सॅनिटरी नॅपकिनची किंमत घटवून 1 रुपये प्रतिपॅड केली आहे. सध्या याची किंमत अडीच रुपये आहे.

जनौषधी केंद्र कसं उघडतात?

जेनेरिक मेडिकल स्टोअर सुरू करण्यासाठी अडीच लाख रुपयांचा खर्च येतो आणि याचा पूर्ण खर्च सरकार करतं. यासाठी सरकारने 3 श्रेणी बनवल्या आहेत.

सरकारने केल्या 3 श्रेणी

पहिल्या श्रेणीत कुणीही व्यक्ती, बेरोजगार फार्मासिस्ट, डॉक्टर किंवा रजिस्टर्ड मेडिकर प्रॅक्टिशनर स्टोअर सुरू करू शकतं.

दुसऱ्या श्रेणीत ट्रस्ट, एनजीओ, खाजगी हॉस्पिटल, सोसायटी सेल्फ हेल्प ग्रुप यांना संधी मिळेल.तिसऱ्या श्रेणीत राज्य सरकारने नामांकन केलेल्या संस्था असतील.

(हेही वाचा : Aadhaar मध्ये मोबाइल नंबर आणि ई मेलचं व्हेरिफिकेशन झालं सोपं, या अ‍ॅपने होईल काम)

केवढी जागा आवश्यक ?

तुम्ही जर यासाठी अर्ज केला तर आधार कार्ड आणि पॅन कार्ड गरजेचं आहे.  तसंच मेडिकल स्टोअर सुरू करायचं असेल तर कमीत कमी 120 चौ. फूट जागा आवश्यक आहे.

जेनेरिक मेडिकल स्टोअरमध्ये एका महिन्यात जेवढी औषधं विकली जातील त्याच्या 20 टक्के कमिशन मिळेल.जनऔषधी केंद्र सुरू करण्यासाठी तुम्ही  https://janaushadhi.gov.in या वेबसाइटवर फॉर्म डाउनलोड करू शकता.

========================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2020 08:19 PM IST

ताज्या बातम्या