Home /News /money /

भव्य हॉटेलमध्ये नाकारला प्रवेश, म्हणूनच अपमानाचा बदला घेण्यासाठी जमशेदजी टाटा यांनी उभारलं ताज हॉटेल

भव्य हॉटेलमध्ये नाकारला प्रवेश, म्हणूनच अपमानाचा बदला घेण्यासाठी जमशेदजी टाटा यांनी उभारलं ताज हॉटेल

ताज हॉटेलचा दर्जा (Quality) आणि अतिथ्य (Accommodation) यास आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. कारण ताज हॉटेलला ब्रँड फायनान्स कडून ` सर्वोत्कृष्ट हॉटेल ब्रँड` असा दर्जा बहाल करण्यात आला आहे.

मुंबई, 07 ऑगस्ट: ताज हॉटेलमध्ये (Taj Hotel) राहणं आणि भोजनाचा आनंद घेणं हे जवळजवळ प्रत्येकाचं स्वप्न असतं. मुंबईतील ताज हॉटेलच्या सौंदर्याची चर्चा जगभरात होत असते. समुद्र किनारी असलेलं हे हॉटेल मुंबईची (Mumbai) शान समजलं जातं. त्यामुळे हे हॉटेल पाहण्यासाठी दूरवरुन पर्यटक येत असतात. ज्या लोकांनी ताजमधील पाहुणचार किंवा अतिथ्याचा अनुभव घेतला आहे, ते अन्य लोकांना एकदा तरी ताजमध्ये जावे, असा सल्ला आवर्जून देतात. दक्षिण आशियातील सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनीच्या (HCL) हे जगातील भव्य हॉटेल्सपैकी एक हॉटेल मानले जाते. नुकतंच ताज हॉटेलचा दर्जा (Quality) आणि अतिथ्य (Accommodation) यास आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. कारण ताज हॉटेलला ब्रँड फायनान्स कडून ` सर्वोत्कृष्ट हॉटेल ब्रँड` असा दर्जा बहाल करण्यात आला आहे. मात्र अनेक भारतीयांना या हॉटेलच्या उभारणीमागील खरं कारण माहिती नाही. अपमानाचा बदला घेण्यासाठी केली ताज हॉटेलची उभारणी जमशेदजी टाटा (JRD Tata) यांनी ताज हॉटेलची उभारणी केली आहे. इंग्रजांच्या काळातील ही घटना आहे. एकदा एका भव्य अशा हॉटेलमध्ये जमशेदजी टाटा यांना प्रवेश नाकारण्यात आला. इथे केवळ इंग्रजांना प्रवेश असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. हा भारतीयांचा अपमान आहे, असं जमशेदजी टाटा यांना वाटलं आणि जिथं भारतीयांसह सर्व परदेशी नागरिक कोणत्याही निर्बंधांशिवाय राहू शकतील, असं भव्य हॉटेल उभारण्याचा निश्चय त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी लक्झरी हॉटेल (Luxury Hotel) ताजची उभारणी सुरु केली आणि देशातील पहिले सुपर लग्झरी हॉटेल अस्तित्वात आले आणि आज हे हॉटेल सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाचे! आजपासून रविवार रात्रीपर्यंत बंद राहणार आवश्यक सेवा, लवकर पूर्ण करा तुमची कामं समुद्रकिनारी वसलेलं ताज महाल पॅलेस हे मुंबईचा हिरा समजलं जातं. या हॉटेलमुळे मुंबईच्या सौंदर्यात मोलाची भर पडली आहे. ताजची पायाभरणी टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी 1898 मध्ये सुरु केली. 31 मार्च 1911 ला गेट वे ऑफ इंडियाची पायाभरणी होण्यापूर्वी म्हणजेच 16 डिसेंबर 1902 रोजी पहिल्यांदा पाहुण्यांसाठी या हॉटेलचे दरवाजे खुले करण्यात आले. लाईटचा झगमगाट असलेली ताज महाल पॅलेस ही मुंबईतील पहिली इमारत ठरली. या हॉटेलची निर्मिती ताज महाल पॅलेस आणि टॉवर अशा दोन वेगवेगळ्या इमारतींमध्ये करण्यात आली. या दोन्ही इमारती इतिहास आणि स्थापत्य कलेच्या दृष्टीने भिन्न आहेत. ताज महाल पॅलेसची उभारणी 20 व्या शतकाच्या सुरुवातीला करण्यात आली तर टॉवर 1973 मध्ये सुरु करण्यात आला. पहिलं महायुध्द ते मुंबई हल्ला पर्यंतच्या अनेक घटनांचे साक्षीदार या हॉटेलला प्रदीर्घ आणि विशिष्ट असा इतिहास आहे. यात राष्ट्रपती, उद्योगपती, सेलिब्रिटींसारख्या काही सन्माननीय व्यक्तींचे योगदानही आहे. 1929 मध्ये पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जीना यांची दुसरी पत्नी रतनबाई पेटिट यांचे त्यांच्या अखेरच्या दिवसात काही काळ वास्तव्य या हॉटेलमध्ये होते. पहिल्या महायुध्दाच्या काळात या हॉटेलचे रुपांतर सैन्य रुग्णालयात करण्यात आले. यावेळी येथे 600 बेडसची व्यवस्था करण्यात आली होती. हे हॉटेल 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख ठिकाणांपैकी एक होते.

Gold Price Today: 5 दिवसांत 450 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, आज होतेय या दराने विक्री

जगातील सर्वात दमदार हॉटेल ब्रँड 2008 मधील मुंबईवरील हल्ला आणि त्यानंतर निर्माण झालेले अनेक चढ-उतार असे असूनही ताज हॉटेल साखळीने ब्रँड फायनान्सच्या ग्लोबल ब्रॅंण्ड इक्विटी मॉनिटरवर विशेषतः भारतातील देशातंर्गत बाजारपेठेतील विचार, ओळख, शिफारस आणि प्रतिष्ठा यासाठी चांगले गुण प्राप्त केले आहेत.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Money, Ratan tata, Tata group

पुढील बातम्या