पदवी नसेल तरी मिळेल या बड्या ई कॉमर्स कंपनीत नोकरी

पदवी नसेल तरी मिळेल या बड्या ई कॉमर्स कंपनीत नोकरी

हल्ली ई काॅमर्स कंपनींची चलती आहे. अशाच एका मोठ्या ई काॅमर्स कंपनीत नोकरी देताना पदवी पाहिली जात नाही.

  • Share this:

मुंबई, 08 मे : चीनची सर्वात मोठी ई काॅमर्स कंपनी अलिबाबा मा युन 'जॅक मा'च्या नावानंही ओळखली जाते. ही कंपनी कुठल्या तयार असलेल्या नियमांच्या आधारावर काम करत नाही. ते जे काही करतात त्यात फायदा कसा होईल हे ते पाहात असतात. जॅक मा नेहमी सांगतात, माझं गणित चांगलं नाही. मी कुठल्या प्रबंधाचा अभ्यास केला नाही. आजही मी अकाऊंट्स रिपोर्ट वाचू शकत नाही. तरीही आज ही कंपनी यशस्वी ठरलीय. एका खोलीत सुरू केलेली अलिबाबा कंपनी आज चीनची सर्वात यशस्वी ई काॅमर्स कंपनी. नुकतंच ग्लोबल इकाॅनाॅमिक फोरममध्ये त्यांनी सांगितलं की, जेव्हा तुम्ही तुमच्यापेक्षा जास्त स्मार्ट लोकांना नोकरीवर ठेवता, तेव्हा तुमचा व्यवसाय यशस्वी होतो आणि तुम्ही आनंदी राहता.

5 हजार रुपये गुंतवून कमवा 49 लाख, 'अशी' करा सुरुवात

काही दिवसांपूर्वी ओव्हरटाइम वर्क कल्चरला प्रोत्साहन दिल्याबद्दल जॅक मा यांना लोकांनी ट्रोल केलं होतं. त्यांच्यावर खूप टीका झाली होती.


अलिबाबामध्ये नोकरीसाठी लागणार नाही पदवी, जॅक मानं सांगितल्या महत्त्वाच्या गोष्टी

जॅक मानं सांगितलं, ' तुमचा उमेदवार स्मार्ट हवा. तो बिनडोक असेल तर काही इलाज नाही. उमेदवार तुमच्यापेक्षा जास्त स्मार्ट हवा.'

रिक्षा ड्रायव्हरनं खरेदी केला 1.6 कोटींचा बंगला, सत्य तपासताना आयकर अधिकाऱ्यांच्या आले नाकीनऊ

मी जेव्हा कोणाला नोकरीवर ठेवतो तेव्हा हा विचार करतो की उमेदवार माझ्यापेक्षा स्मार्ट हवा. म्हणजे 4 ते 5 वर्षांत ती व्यक्ती माझा बाॅस बनू शकेल. त्याच्यासाठी मला काम करणं आवडेल.

जॅक मा सांगतात, नोकरीसाठी येणाऱ्या उमेदवाराचं व्यक्तिमत्त्व चांगलं असायला हवं. हे खूप महत्त्वाचं आहे.


ते म्हणतात, नोकरी करणारा नेहमी सकारात्मक हवा. हार न मानणारा हवा. मी कधी कोणाला डिगरी, डिप्लोमा विचारत नाही. तो कुठल्या युनिव्हर्सिटीचा आहे, हे माझ्यासाठी कधीच महत्त्वाचं नसतं.

राणेंना शिवसेनेत ठेवलंत, तर मी घर सोडून जाईन; उद्धव ठाकरेंची बाळासाहेबांना धमकी

अलिबाबाच्या संस्थापकावर अगोदरचा अनुभव प्रभाव पाडत नाही. ते म्हणतात, योग्य लोकांना नोकरीवर ठेवा, त्यांच्या बरोबर काम करा, त्यांना प्रशिक्षण द्या आणि एकमेकांचा विकास करा

हा विचार अजिबात करू नका की यानं गुगल, अलिबाबा किंवा फेसबुकमध्ये काम केलंय तर तो खूप चांगला असेल, असं जॅक मा म्हणाले.


VIDEO: 'जन्मदात्यांपासून जीवाला धोका', कोर्टाची पायरी चढणाऱ्या प्रियांकाची धक्कादायक गोष्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 03:09 PM IST

ताज्या बातम्या