गणितात फक्त 1 मार्क मिळवणाऱ्या साध्या शिक्षकाने कशी सुरू केली सर्वात मोठी e shopping ची कंपनी?

गणितात फक्त 1 मार्क मिळवणाऱ्या साध्या शिक्षकाने कशी सुरू केली सर्वात मोठी e shopping ची कंपनी?

alibaba.com ही आशियातली सर्वांत मोठी e commerce कंपनी स्थापन करणाऱ्या जॅक मा यांच्याकडे काँप्युटर सायन्सची पदवी नव्हती. गणितातही ते ढ होते. या शिक्षकाने जगातला सर्वात मोठा उद्योगपती होण्याचा मान मिळवला आणि त्या उद्योगापासून तो अलगद बाजूलाही झाला.

  • Share this:

शांघाय (चीन), 10 सप्टेंबर : अलिबाबा.कॉम या जगातल्या बड्या ई कॉमर्स कंपनाचे संस्थापक आणि संचालक जॅक मा आपल्याच कंपनीतून पायउतार झाले आहेत. आपल्या 55 व्या वाढदिवशीच त्यांनी हा निर्णय घेतला आणि कंपनीतून निवृत्ती घेतली. alibaba.com ही आशियातली सर्वांत मोठी e commerce कंपनी आहे आणि ही कंपनी स्थापन करणाऱ्या जॅक मा यांच्याकडे काँप्युटर सायन्सची पदवीसुद्धा नव्हती. गणितातही ते फार हुशार नव्हते. शाळेत असताना तर गणितात त्यांना एकदा फक्त 1 गुण मिळाला होता. अगदी सामान्य घरातून आलेल्या या शिक्षकाने जगातला सर्वात मोठा उद्योगपती होण्याचा मान मिळवला आणि त्या उद्योगापासून तो अलगद बाजूलाही झाला.

जॅक मा यांची जागा त्यांनीच निवडलेले डॅनियल त्झांग हे घेणार आहेत. अॅमेझॉनला टक्कर देणाऱ्या अलिबाबा या जगातल्या बड्या ई-कॉमर्स कंपनीचे प्रमुख जॅक मा  यांनी ५४ व्या वर्षीच निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की १० सप्टेंबरला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच ते निवृत्त होणार असल्याचं वर्षभरापूर्वी जाहीरही केलं होतं.

हे वाचा - सावधान! पैशाच्या देवाण-घेवाणीचे 'हे' 7 कडक नियम मोडलेत तर नक्की येईल नोटीस

जॅक यांनी त्यांच्या करीअरची सुरुवात ही शिक्षक म्हणून केली.  शिक्षाकापासून उद्योजकापर्यंत आणि जगातल्या श्रीमंतांपैकी एक होण्यापर्यंतचा जॅक यांचा प्रवास अचंबित करणारा आहे.

जॅक यांनी 1999मध्ये हांगझूच्या एका अपार्टमेंटमध्ये अलीबाबा कंपनीची सुरुवात केली. त्यावेळी त्यांचं काम पाहून लोकांनी त्यांना बिनकामाचा रिकामटेकडा माणूस समजले.

संबंधित - जगाला शॉपिंगची चटक लावणारा अलिबाबाचा जनक 55 व्या वर्षीच का सोडतोय कंपनी?

बिल गेट्स किंवा स्टीव जॉब्ससारखं त्यांच्य़ाकडे देखील काँप्युटर सायन्सची कुठलीच डिग्री नव्हती. 1980 मध्ये त्यांनी एका शाळेत शिक्षकाची नोकरी केली आहे. तीन वर्षानंतर त्यांनी ती नोकरा सोडून स्वतःची कंपनी सुरू केली.

मिस्टर इंटरनेट

1994मध्ये जेव्हा ते त्यांच्या व्यवसायाशी संबंधित अमेरिकेत गेले होते. तेव्हा त्यांनी पहिलांदा इंटरनेट पाहिलं आणि ते थक्क झाले. त्यानंतर चीनमध्ये 'मिस्टर इंटरनेट' या नावाने प्रसिद्ध झाले.

चीनचे स्टीव्ह जॉब्ज

21 फेब्रुवारी 1999ला जॅक मा ने अलीबाबा या कंपनीची स्थापना केली आणि कंपनीत इन्व्हेस्ट करण्यासाठी त्यांनी 17 मित्रांना तयार केलं. सुरुवातीच्या अडचणींनंतर त्यांच्या कंपनीने वेगाने प्रगती सुरू केली. चीनचे स्टीव्ह जॉब्ज असंही त्यांना म्हणतात.

हे यश त्य़ांना सहजासहजी नाही मिळालेलं. तब्बल 30 नोकऱ्यांध्ये निराशा मिळाल्यानंतर त्यांनी अलिबाबा सुरू करण्याचं ठरवलं.

चीनची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाचे फाऊंडर जॅक मा आशियातील सर्वात राईस व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार त्यांची एकूण वेल्थ 3740 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 2.43 लाख कोटी रुपये इतकी आहे.

2013 पर्यंत ते अलिबाबाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यानंतर त्यांनी अध्यक्ष म्हणून या कंपनीचा कारभार सांभाळला. आणि आता ते निवृत्त झाले आहेत.

-------------------------------------------------------------

भयानक! रहिवासी इमारतीवर कोसळली वीज; अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: September 10, 2019, 5:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading