अमित शहांच्या भाषणानंतर पाकिस्तानी शेअर बाजार कोलमडला; कोट्यवधी बुडाले

Jammu & Kashmir, Article 370 - गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर कलम 370 हटवण्याबद्दल राज्यसभेत घोषणा केली आणि त्याचा परिणाम पाकिस्तानच्या शेअर मार्केटवर झाला

News18 Lokmat | Updated On: Aug 5, 2019 04:59 PM IST

अमित शहांच्या भाषणानंतर पाकिस्तानी शेअर बाजार कोलमडला; कोट्यवधी बुडाले

मुंबई, 05 ऑगस्ट : गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर कलम 370 हटवण्याबद्दल राज्यसभेत घोषणा केल्यानंतर पाकिस्तानच्या शेअर बाजारात हाहाकार माजला. पाकिस्तानचा शेअर बाजाराचा बेंचमार्क निर्देशांक KSE100 600 अंकांपेक्षा जास्त घसरला. असंख्य गुंतवणूकदारांचे अनेक कोटी रुपये बुडाले. त्यांचं प्रचंड नुकसान झालं. गृहमंत्र्यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याची शिफारस केलीय. जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेला कलम 370 हटल्यानंतर देशात इतर राज्यात सुरू असलेले सर्व कायदे लागू होणार आहेत. जम्मू-काश्मीरसाठी वेगळे कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारला मिळाला आहे.

650 अंकांनी पाकिस्तान शेअर बाजाराची घसरण

पाकिस्तानच्या शेअर बाजारात हाहाकार माजलाय.बाजार पूर्ण कोलमडलाय. केएसई100 31666.41 स्तरावर शेअर बाजार सुरू झाला होता. पण गृहमंत्री अमित शहा यांनी कलम 370 हटवण्याची घोषणा केल्यानंतर पाकिस्तानच्या शेअर बाजारात एकच खळबळ माजली. केएसई100 687.45 अंकाची घसरण होऊन 30,978.96 स्तरावर आला. हा आजच्या दिवसातला सर्वात खालचा स्तर आहे.

असं आहे PoK : पाकिस्तान ज्याला 'आझाद काश्मीर' म्हणतं ते आहे इतकं सुंदर!

जगातला सर्वात वाईट कामगिरी करणारा शेअर बाजार

Loading...

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार पाकिस्तानचा शेअर बाजार गेली दोन वर्ष सर्वात वाईट कामगिरी करतोय. गुंतवणूकदारांचे 6,88,000 कोटी पाकिस्तानी रुपये बुडालेत.

मोदी सरकार देतेय 1500 रुपयांपर्यंत स्वस्त सोनं खरेदीची संधी, होणार हे 3 फायदे

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सत्तेत आल्यानंतर एक वर्षांनी लोकांच्या रोषाला तोंड द्यावं लागतंय. गेल्या वर्षी जुलैमध्ये ते सत्तेत आले. तेव्हापासून पाकिस्तानात महागाई प्रचंड वाढलीय. अमेरिकन डाॅलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया 30 टक्के घसरलाय. महागाईचा दर 10.34 टक्के आहे आणि तो वाढण्याचीच शक्यता आहे.

EPFO नं बदलला PF मधून पैसे काढण्याचा नियम, 'या' आहेत नव्या अटी

राज्यात होतील हे 10 मोठे बदल

1) जम्मू आणि काश्मीरमधल्या नागरिकांचा दुहेरी नागरिकत्व संपणार. इतर राज्यांप्रमाणेच तेही भारताचे नागरिक होतील.

2) आता देशातल्या इतर राज्यांमध्ये नागरिक जम्मू आणि काश्मीरमध्ये जमीन आणि संपत्ती घेऊ शकतील.

3) केंद्र सरकारच्या सर्व कायद्यांची आता जम्मू आणि काश्मीरमध्ये थेट अंमलबजावणी होईल.

4) जम्मू आणि काश्मीरसाठी वेगळे कायदे करण्याची गरज राहणार नाही.

5) कलम 360 नुसार केंद्र सरकार आता जम्मू आणि काश्मीरमध्ये आर्थिक आणीबाणीची घोषणा करू शकते.

6) आत्तापर्यंत राज्याचा आणि केंद्राचा असे दोन राष्ट्रध्वज होते. आता मात्र फक्त तिरंगा हा एकच ध्वज असेल.

7) देशातल्या इतर राज्यांप्रमाणे जम्मू आणि काश्मीरमध्ये आता दर पाच वर्षांनी निवडणुका होती. आधी दर सहा वर्षांनी निवडणुका होत होत्या.

8) राज्यातलं पोलीस दल आता केंद्राच्या अधिकारात येईल.

9) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणि काश्मीर खोऱ्यात शाखा उघडता येतील.

10) आता खोऱ्यातही हिंदू आमदार निवडून येऊ शकतील.

कलम 370 हटवल्यानंतर काय होणार? पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 5, 2019 04:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...