इन्कम टॅक्स रिटर्न भरताय? मग 'ही' काळजी घ्यायलाच हवी

इन्कम टॅक्स रिटर्न भरताय? मग 'ही' काळजी घ्यायलाच हवी

Income Tax Return - इन्कम टॅक्स रिटर्न भरताना कधीही घाई करू नका. रिटर्न भरताना कशी काळजी घ्यायची ते पाहा?

  • Share this:

मुंबई, 1 ऑगस्ट : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख 1 महिन्यांनी वाढवलीय. आता 31 ऑगस्ट 2019पर्यंत तुम्ही ITR भरू शकता. तुम्ही रिटर्न फाॅर्ममध्ये लाॅग इन केलं तर एक्सेल शीटमध्ये बरीच माहिती पहिल्यांदाच भरलेली पाहायला मिळते. पण ती नीट तपासून पाहणं गरजेचं आहे.

Pre-Filled ITR काय आहे?

रिटर्नमध्ये पहिल्यांदाच जी माहिती भरलेली असते, तिला Pre-Filled ITR म्हणतात. सरकार आधीही प्री फिल्ड माहिती देत आलीय. त्यात बँक खात्याचा नंबर, वडिलांचं नाव, रिटर्न फाइल करणाऱ्याचं नाव आणि आधार नंबर.

('या' गोष्टी आजपासून होणार 'स्वस्त', कुठल्या व्यवहारांमध्ये वाचणार पैसे?)

आता मिळेल ही माहिती

यावेळी मिळकतीची पूर्ण माहिती फाॅर्ममध्ये दिसेल. म्हणजे HRA, अलाउन्स व्हॅल्यू, कर सवलतीची माहिती यात असेल. एप्लाॅयरनं कापलेल्या टॅक्सची माहिती असेल. घर मालमत्ता ते भाड्यातून मिळणारी रक्कम यावरच्या TDSबद्दलही यात असेल. ITR मध्ये लिहिलेल्या सर्व गोष्टींची तपासणी नीट करणं आवश्यक आहे.

(रोज करा 40 रुपयांची बचत आणि 'अशा' प्रकारे मिळवा 8 लाख)

न बघता रिटर्न भरू नका

एम्प्लाॅयरद्वारे कर सवलत क्लेम केलेली नसेल तर ती नंतर घेता येते. फाॅर्म 16मध्ये असलेले तपशीलही नीट पाहणं गरजेचं आहे.

(राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भूकंप; पवारांच्या जवळचाच नेता करणार भाजपात प्रवेश?)

रिटर्ननंतर व्हेरिफाय करा

ITR भरल्यानंतर युजर्सनी तो व्हेरिफाय करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही फाॅर्म व्हेरिफाय केला नाही, तर इन्कम टॅक्स नियमांप्रमाणे तो वैध मानला जात नाही. व्हेरिफाय करण्यासाठी OTP येतो. त्यासाठी तुमचा फोन नंबर आधार कार्डाशी जोडला असला पाहिजे. OTP इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाइटवर टाकला की तुमचा रिटर्न व्हेरिफाय होईल. याशिवाय तुम्ही बँक एटीएम, बँक अकाउंट, डिमॅट अकाउंट आणि नेट बँकिंगद्वारे तुम्ही ITR व्हेरिफाय करू शकता.

VIDEO: येडियुरप्पा अग्निपरीक्षेत पास, आवाजी मतदानानं जिंकला विश्वासदर्शक ठराव

First published: July 29, 2019, 1:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading