मराठी बातम्या /बातम्या /मनी /ITR भरण्याची डेडलाइन आलीये अगदी जवळ, आजच पूर्ण करा हे काम

ITR भरण्याची डेडलाइन आलीये अगदी जवळ, आजच पूर्ण करा हे काम

 इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख (Income tax return file) 31 डिसेंबर 2021 आहे. तुम्ही जर ही डेडलाइन चुकवली तर 5000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख (Income tax return file) 31 डिसेंबर 2021 आहे. तुम्ही जर ही डेडलाइन चुकवली तर 5000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख (Income tax return file) 31 डिसेंबर 2021 आहे. तुम्ही जर ही डेडलाइन चुकवली तर 5000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

नवी दिल्ली, 06 डिसेंबर: इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख (Income tax return file) 31 डिसेंबर 2021 आहे. तुम्ही जर ही डेडलाइन चुकवली तर 5000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. दरम्यान काही करदात्यांना या दंडापासून सूट मिळू शकते. कोणताही दंड भरल्याशिवाय त्यांना या डेडलाइन (Income tax return filing deadline) नंतरही आयटीआर (ITR update) दाखल करता येईल.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (CBDT) वित्त वर्ष 2020-21 साठी आयटीआर भरण्याची डेडलाइन पुन्हा एकदा वाढवून 31 डिसेंबर 2021 केली आहे. यानंतर आयटीआर भरणाऱ्यांना 5000 रुपये दंड भरावा लागेल. इन्कम टॅक्स कायदा सेक्शन 234F मध्ये याबाबत नमुद करण्यात आले आहे. दरम्यान जर टॅक्सपेयरचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी असेल तर त्याला 1000 रुपये दंड भरावा लागेल. 5 लाखांपेक्षा जास्त कमाई असणाऱ्यांना दंडाची रक्कम वाढत जाईल.

हे वाचा-कोरोना काळातही कृषी आणि प्रक्रिया उत्पादनांच्या निर्यातीत 13 टक्क्यांनी वाढ

या लोकांना नाही द्यावा लागणार दंड

ज्यांचे एकूण उत्पन्न मूळ सवलतीच्या मर्यादेपेक्षा जास्त नाही, त्यांना ITR भरण्यास उशीर झाल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही. एकूण उत्पन्न (Gross Total Income) सवलतीच्या मूळ मर्यादेपेक्षा कमी असेल, तर रिटर्न उशीरा भरल्याबद्दल कलम 234F अंतर्गत कोणताही दंड लागणार नाही.

हे वाचा-Edelweiss Securities ची 'या' सरकारी कंपनीचा शेअर खरेदीची शिफारस

मंत्रालयाकडून आयटीआर दाखल करण्याचे आवाहन

मंत्रालयाने आतापर्यंत ज्यांनी आयटीआर दाखल केला नाही आहे, त्यांना लवकर हे काम पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. एका अधिकृत निवेदनात अशी माहिती समोर आली आहे की, दररोज फाइल केल्या जाणाऱ्या इन्कम टॅक्स रिटर्नची संख्या 4 लाखापेक्षा जास्त झाली आहे. त्याचप्रमाणे जशी या कामाची डेडलाइन जवळ येते आहे, तशी आयटीआर फाइल करणाऱ्यांच्या संख्येत तेजीने वाढ होत आहे.

First published:

Tags: Income tax, Money