मराठी बातम्या /बातम्या /मनी /केवळ 5000 रुपये गुंतवून करा मोठी कमाई! आजपासून गुंतवणुकीसाठी नवा पर्याय

केवळ 5000 रुपये गुंतवून करा मोठी कमाई! आजपासून गुंतवणुकीसाठी नवा पर्याय

ITI Value Fund: आयटीआय म्युच्युअल फंड एक नवीन ऑफर  (NFO) आयटीआय व्हॅल्यू फंड सुरू करत आहे. या नवीन फंडची ऑफर 25 मे पासून सुरू झाली आहे

ITI Value Fund: आयटीआय म्युच्युअल फंड एक नवीन ऑफर (NFO) आयटीआय व्हॅल्यू फंड सुरू करत आहे. या नवीन फंडची ऑफर 25 मे पासून सुरू झाली आहे

ITI Value Fund: आयटीआय म्युच्युअल फंड एक नवीन ऑफर (NFO) आयटीआय व्हॅल्यू फंड सुरू करत आहे. या नवीन फंडची ऑफर 25 मे पासून सुरू झाली आहे

नवी दिल्ली, 25 मे: जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आणखी एक पर्याय खुला झाला आहे. आयटीआय म्युच्युअल फंडने (ITI Mutual Fund) एक नवीन ऑफर  (NFO) आयटीआय व्हॅल्यू फंड (ITI Value Fund) ची सुरुवात केली आहे. या नवीन फंडची ऑफर 25 मे पासून सुरू झाली आहे. संबंधित NFO 8 जून रोजी बंद होणार आहे. या फंडमध्ये कमीत कमी 5000 रुपये अॅप्लिकेशन रक्कम आणि त्यानंतर एक रुपयाच्या पटीत गुंतवणूक केली जाऊ शकते. जाणून घ्या या फंडबाबत

याआधी हा फंड ठरला आहे गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर

आयटीआय व्हॅल्यू फंड हा आयटीआय म्युच्युअल फंडाचा 12 वा फंड आहे. याआधी आयटीआय म्युच्युअल फंडाने बाजारात 11 मोठी गुंतवणूक उत्पादने बाजारात आणली आहेत जी गुंतवणूकदारांसाठी चांगली असल्याचे सिद्ध झाले आहे.

हे वाचा-तुम्ही देखील LIC Policy खरेदी करणार असाल तर सावधान! अन्यथा बुडतील सर्व पैसे

नवीन एनएफओच्या प्रारंभाच्या वेळी आयटीआय म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी (सीआयओ) जॉर्ज हॅबर जोसेफ म्हणाले की, या फंड हाऊसने सुरुवातीपासूनच  गुंतवणूकीचा अनोखा अनुभव दिला आहे.

लाँग टर्ममध्ये करा गुंतवणूक, मिळेल चांगला रिटर्न

ही योजना अशा लोकांसाठी फायदेशीर ठरेल जे लाँग टर्ममध्ये गुंतवणूक करू चांगला रिटर्न मिळवू इच्छितात. शिवाय जे व्हॅल्यू ओरिएंटेड इनव्हेस्टमेंट स्ट्रॅटजीचं पालन करतात.

हे वाचा-Gold Price Today: खूशखबर! सोन्याचांदीची झळाळी उतरली, वाचा काय आहे आजचा भाव

जॉर्ज हॅबर जोसेफ यांनी असं म्हटलं की, आम्ही टी 30 शहरं आणि काही बी 30 स्थानांवर लक्ष केंद्रित करीत आहोत ज्याठिकाणाहून आम्हाला गुंतवणूकदारांचा चांगला सपोर्ट मिळाला आहे. आम्ही आमच्या गुंतवणुकदारांना चांगल्या गुंतवणूकीची उत्पादने देण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहोत.

First published:
top videos

    Tags: Investment