मुंबई, 23 जुलै : तुम्ही नोकरी शोधताय? सोसायटी फाॅर अप्लाइड मायक्रोव्हेव इलेक्ट्राॅनिक्स इंजिनियर्स अँड रिसर्च (SAMEER ) इथे 42 ITI अॅपरेंटिस ट्रेनी पदासाठी व्हेकन्सी आहे. फिटर, टर्नर,मशीनिस्ट, सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट, इलेक्ट्रिशिअन, इलेक्ट्रोप्लेटर, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, PASAA/COPA, IT & ESM, मेकॅनिक (Reff.& AC) या पदांवर भरती होतेय.
पदाचं नाव - ITI अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
पदं आणि पदं संख्या
फिटर- 5
टर्नर- 2
मशीनिस्ट- 4
सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट-1
इलेक्ट्रिशिअन - 1
इलेक्ट्रोप्लेटर- 1
ड्राफ्ट्समन मेकॅनिकल -1
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - 16
PASAA/COPA- 9
IT & ESM- 1
मेकॅनिक (Reff.& AC)-1
फक्त 5 हजार रुपये आणि 8वी पास, Post Office देतेय व्यवसायाची संधी
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा आणि दर महिन्याला घ्या फायदा
शैक्षणिक पात्रता
1. PASAA/COPA: 55% गुणांसह 12वी उत्तीर्ण हवं. ITI उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षातील उमेदवार
2. इतर पदांसाठी 55% गुणांसह 10वी उत्तीर्ण हवं. ITI उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षातील उमेदवार हवा
नोकरीचं ठिकाण मुंबई आहे. अर्जाची फी नाही. थेट मुलाखतच घेतली जाईल. मुलाखत 30, 31 जुलै आणि 1 ऑगस्ट रोजी घेतली जाईल.
ग्रॅज्युएट्स आणि इंजिनियर्सना SAIL मध्ये नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज
मुलाखतीचं ठिकाण - SAMEER, ITI कँपस, हिलसाइड, पवई, मुंबई . अधिक माहितीसाठी https://www.sameer.gov.in/ इथे क्लिक करा.
याशिवाय स्टील अथाॅरिटी ऑफ इंडिया लिमिटेडनं ( SAIL ) एक्झिक्युटिव्ह आणि नाॅन एक्झिक्युटिव्ह पदासाठी व्हेकन्सी काढल्यात. या पदांसाठी 31 जुलैच्या आधी अर्ज करावा, असं कंपनीनं सांगितलंय.
एक्झिक्युटिव्ह आणि नाॅन एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करण्यासाठी स्टील अथाॅरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची ऑफिशियल वेबसाइट sail.co.in वर जाऊन अर्ज करा. SAIL मध्ये एकूण 205 व्हेकन्सीज आहेत. त्यात 29 पदं एक्सिक्युटिव्हसाठी आहेत आणि 176 पदं नाॅन एक्झिक्युटिव्हसाठी आहेत.
एक्झिक्युटिव्ह पदासाठी फी आहे 500 रुपये. ऑपरेटर कम टेक्निशियन (ट्रेनी), ऑपरेटर कम टेक्निशियन (बॉयलर ऑपरेटर) पदासाठी फी आहे 250 रुपये. सर्व उमेदवारांनी sail.co.in इथे क्लिक करावं. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2019 आहे.
VIDEO : पुणे पोलिसांची दरवाजा तोडून घरात एंट्री, फासावर लटकणाऱ्या तरुणाला थोडक्यात वाचवलं