IT क्षेत्रात 40 हजार नोकऱ्या जाण्याची शक्यता, या दिग्गजांनी दिले संकेत

IT क्षेत्रात 40 हजार नोकऱ्या जाण्याची शक्यता, या दिग्गजांनी दिले संकेत

देशातल्या आयटी क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे यावर्षी 30 ते 40 हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. आयटी क्षेत्रातले दिग्गज मोहनदास पै यांनीच हा सावधगिरीचा इशारा दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : देशातल्या आयटी क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे यावर्षी 30 ते 40 हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. आयटी क्षेत्रातले दिग्गज मोहनदास पै यांनीच हा सावधगिरीचा इशारा दिला आहे. पै हे इन्फोसिस या आयटी कंपनीमध्ये वरिष्ठ अधिकारी होते.नोकऱ्या जाण्याचा धोका असला तरी पै यांच्या मते ही सामान्य बाब आहे. कोणत्याही उद्योगात दर पाच वर्षांनी असं होतं राहतं, असं त्यांनी म्हटलंय.

पै म्हणाले, पाश्चिमात्य देशांत सगळ्यात क्षेत्रांत असं होत असतं. भारतातही जेव्हा एखाद्या उद्योगाची वाढ पूर्ण होते तेव्हा मध्यम स्तरावरचे काही कर्मचारी त्यांना मिळणाऱ्या वेतनाच्या तुलनेत जास्त पैसे मिळवू शकत नाहीत.जेव्हा कंपन्यांची वेगाने वाढ होते तेव्हा प्रमोशन दिली जातात. पण कंपनीची अपेक्षित वाढ होत नाही तेव्हा मात्र याच जास्त पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढलेली असते.

(हेही वाचा : मंदीवर तोडगा काढण्यासाठी मनमोहन सिंग यांचा पुढाकार, मोदी सरकारला दिला हा सल्ला)

5 वर्षांनी कपात

या स्थितीत कंपन्यांना दर पाच वर्षांनी आपल्या कर्मचारी संख्येचा आढावा घ्यावा लागतो आणि कर्मचारी कपात करावी लागते. जर तुम्ही तुम्हाला मिळणाऱ्या पगारानुसार काम केलं नाही तर जास्त पगाराला काहीच अर्थ उरत नाही.

आयटी उद्योगात 30 हजार ते 40 हजार कर्मचाऱ्यांची कपात होऊ शकते. असं असलं तरी 80 टक्के कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यांमुळे नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

=====================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: November 18, 2019, 9:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading