मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Income Tax : कधीपर्यंत आणि कसा मिळेल तुम्हाला करपरतावा?

Income Tax : कधीपर्यंत आणि कसा मिळेल तुम्हाला करपरतावा?

Income Tax Refund मिळण्यासाठी कधी विलंब होतो. त्यामागची कारणं काय? कसा मिळवायचा परतावा?

Income Tax Refund मिळण्यासाठी कधी विलंब होतो. त्यामागची कारणं काय? कसा मिळवायचा परतावा?

Income Tax Refund मिळण्यासाठी कधी विलंब होतो. त्यामागची कारणं काय? कसा मिळवायचा परतावा?

नवी दिल्ली, 16 डिसेंबर : सर्व करदात्यांनी 31 डिसेंबर 2020 अखेर आपला प्राप्तीकर (Income Tax) भरणं आवश्यक आहे. करदात्यांनी जास्तीचा कर भरला असेल तर त्यांना प्राप्तीकर विभागातर्फे अतिरिक्त रक्कम परत केली जाते. असा रिफंड (Refund) किंवा कर परतावा तुम्हाला तुम्ही कर विवरण पत्र  (ITR) (Income Tax Return) भरल्यानंतर काही दिवसातच मिळतो. मात्र तुमच्या कर विवरण पत्र (ITR) भरताना काही चूक झाल्यास रिफंड मिळण्यास वेळ लागतो. रिफंड मिळण्यास उशीर होण्याची कारणे तुम्ही वर्ष 2020-21साठी प्राप्तीकर विवरण पत्र (Income Tax Return) भरले असेल आणि तुम्हाला अजून रिफंड मिळाला नसेल तर काळजी करण्याचं कारण नाही. यंदा सर्वत्र पसरलेल्या कोरोनाच्या महाभयानक साथीमुळे रिफंड मिळण्यास उशीर होत आहे. तसंच प्राप्तीकर विवरण पत्रांवरील (ITR) प्रक्रिया वेगानं व्हावी यासाठी सॉफ्टवेअर अपग्रेड करण्याचे काम सुरू आहे, त्यामुळेही उशीर होत आहे. रिफंड देण्यासाठी कोणतेही अंतिम मुदत नसते. तो तुम्हाला एका आठवड्यातही मिळू शकतो किंवा त्याला उशीरही लागू शकतो. काही वेळा अनेक महिनेही लागतात. तुमच्या विवरणपत्रातील माहितीवर ते अवलंबून असते. प्राप्तीकर विभागानं (Income Tax Department) दिलेल्या माहितीनुसार, अॅसेसमेंट इयर 2020-21 मध्ये करविवरण पत्रांवर सीपीसी 2.0 (CPC 2.0) द्वारे काम करण्यात येणार आहे. यामुळेही रिफंड मिळण्यात उशीर होत आहे. सीपीसी 2.0 (CPC 2.0)  व्यवस्थेत होणारं स्थलांतर आणि या वर्षीच्या विवरण पत्रांवरील कारवाईची प्रक्रिया याची अंतिम मुदत सांगितलेली नाही. यंदा कोरोना साथीमुळे सर्वच उद्योग, व्यवसाय, व्यापार अडचणीत आल्यानं कर विवरण पत्र भरण्याची मुदतही सरकारनं वाढवून 31 डिसेंबर केली आहे. आता कराविवरण पत्र भरण्यासाठी केवळ 15 दिवस उरले आहेत. त्यामुळं करदात्यांनी लवकरात लवकर कर विवरण पत्र भरणं आवश्यक आहे. कराविवरण पत्र भरण्याची पध्दत आता अत्यंत सोपी करण्यात आली असून ऑनलाइन सर्व सेवा उपलब्ध आहेत. वैयक्तिक करदाते, कंपन्या, कंत्राटी कर्मचारी यासाठी वेगवेगळे फॉर्म असून, सर्व फॉर्म्स आता अतिशय सोपे करण्यात आले आहेत. त्यामुळं आता कराविवरण पत्र घरी बसून ऑनलाइन भरणंही शक्य झालं आहे.  विलंबाची कारणं - *कर विवरण पत्रातील अपुरी आणि चुकीची माहिती *चुकीचा बँक खाते क्रमांक, चुकीचा आयएफएससी कोड, *आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करणे या कारणांमुळे रिफंड मिळायला उशीर होतो. अंतिम तारखेच्या आता कर विवरण पत्र भरूनही रिफंड मिळण्यास उशीर झाला तर त्यावर 6टक्के दराने व्याजही दिले जाते.
First published:

Tags: Income tax

पुढील बातम्या