Home /News /money /

कर्जाचा आऊटस्टँडिंग बॅलन्स तपासत राहणं गरजेचं, गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांनी या तीन गोष्टी ठेवा कायम लक्षात

कर्जाचा आऊटस्टँडिंग बॅलन्स तपासत राहणं गरजेचं, गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांनी या तीन गोष्टी ठेवा कायम लक्षात

Home Loan: काही दिवसांमध्येच कर्ज काढून घर विकत किंवा बांधायला घेतात. तुम्ही वेळेत किंवा त्यापूर्वीच कर्जाची परतफेड करू शकाल. पण तसं नाही झालं तर?

नवी दिल्ली, 26 जुलै: स्वतःचं हक्काचं एक घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यामुळे कर्ज काढून का होईना, पण हे स्वप्न पूर्ण करावं असा विचार बरेच लोक करतात. कित्येक लोक चांगली नोकरी मिळाली की काही दिवसांमध्येच कर्ज काढून घर विकत किंवा बांधायला घेतात. (Home Loan) पुढे मग 15-20 वर्षे ही कर्जाची परतफेड करण्यात जातात. या दरम्यान आपली आर्थिक परिस्थिती आहे तशीच राहील, किंवा आणखी चांगली होईल असा विचार बरेच जण करतात. तसं झालं, तर नक्कीच तुम्ही वेळेत किंवा त्यापूर्वीच कर्जाची परतफेड करू शकाल. पण तसं नाही झालं तर? गृहकर्ज घेताना जो व्याजदर होता, तोच पुढे 15-20 वर्षे कायम राहील असं होत नाही. तसेच, आपली आर्थिक परिस्थितीही कायम सारखीच राहील अशीही खात्री देता येत नाही. यात केवळ एकच गोष्ट नक्की आहे, ती म्हणजे काहीही झालं तरी तुम्हाला कर्जाची परतफेड करायची आहेच. त्यामुळेच, वेळेत कर्जफेड करण्यासाठी, आणि व्याजामध्ये जास्तीची रक्कम देणं टाळण्यासाठी आपल्या गृहकर्जाच्या खात्यावर वेळोवेळी लक्ष ठेवणं गरजेचं आहे. नियमितपणे आपल्या कर्जाचा आऊटस्टँडिंग बॅलन्स (Outstanding Balance) किती आहे ते तपासत राहणं गरजेचं आहे. यातूनच मग उरलेली रक्कम एकदम जमा करायची, टॉपअप करायची कि बॅलन्स ट्रान्सफर करायचं हा निर्णय तुम्ही घेऊ शकता. TV9 हिंदीने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

घरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये

कर्जाचा करा बॅलन्स ट्रान्सफर गृहकर्जांवरील व्याजदर हा बदलत राहतो. पतसंस्थांच्या तुलनेत बँकांमधील व्याजदर हा कमी असतो. त्यामुळे तुमचंही कर्ज पतसंस्थेमध्ये असेल, तर तुम्हाला ते कमी व्याजदर असलेल्या बँकेत ट्रान्सफर करता येते. (Balance Transfer) तुमचा रिपेमेंट रेकॉर्ड चांगला असेल, तसेच क्रेडिट स्कोरही योग्य आहे तर तुम्हाला या प्रक्रियेत कसलीच अडचण येणार नाही. यासाठी केवळ एक फॉर्म भरुन केवायसी, इन्कम, एम्प्लॉयमेंट प्रूफ, कर्जाची कागदपत्रे, एनओसी आणि लोन पेमेंट स्टेटमेंट इत्यादी गोष्टी आवश्यक आहेत. वेळेपूर्वी कर्ज फेडा कित्येक वेळा बोनस किंवा लॉटरी स्वरुपात आपल्याला एकदम मोठी रक्कम मिळून जाते. अशा वेळी तुम्हाला नेमकं किती कर्ज शिल्लक राहिलंय हे माहिती असेल, तर ते तुम्ही एकदमच क्लिअर करू शकता. (Home Loan foreclosure) यामुळे तुम्हाला पुढे व्याजही देण्याची गरज भासणार नाही. अगदी पूर्ण रक्कम एकदम भरू शकत नसाल, तरी जास्तीत जास्त रक्कम भरण्याचा प्रयत्न करा. यामुळे एकूण कर्जावरील ईएमआय आणि व्याज कमी होते. यासाठी तुम्हाला फोरक्लोजर अर्ज, आयडी आणि अड्रेस प्रूफ, लोन सँक्शन पेपर अशा कागदपत्रांची आवश्यकता आहे. काही बँका फोरक्लोजरसाठी फी घेतात.

Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदी दरात वाढ, पाहा आजचा लेटेस्ट गोल्ड रेट

वाढीव कर्जासाठी करा टॉप अप आधी घेतलेल्या कर्जातून मिळालेले पैसे पुरेसे नाहीत हे बऱ्याचदा नंतर लक्षात येतं. अशा वेळी तुम्ही बँकेकडून टॉपअप लोन (Top up Loan) घेऊ शकता. यासाठी ओळखपत्र, अड्रेस प्रूफ, इनकम आणि इम्प्लॉयमेंट प्रूफ, टायटल डीड इत्यादी कागदपत्रांची गरज असते. यासाठी बँका प्रोसेसिंग फी आकारतात. तसेच याचा व्याजदरही गृहकर्जापेक्षा अधिक असतो.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Home Loan

पुढील बातम्या