Home /News /money /

Mutual Funds मध्ये गुंतवणूक केली असेल तर आधारशी लिंक करा; अन्यथा पैसे देखील अडकू शकतात

Mutual Funds मध्ये गुंतवणूक केली असेल तर आधारशी लिंक करा; अन्यथा पैसे देखील अडकू शकतात

म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Investment) करणाऱ्यांसाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जर तुम्ही तुमचं पॅन आणि आधार कार्ड लवकरात लवकर लिंक केलं नाहीत तर नंतर अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

मुंबई, 9 मे: आधार कार्ड (Aadhaar Card) हा भारतातील महत्त्वाचा दस्तऐवज ठरला आहे. ओळखपत्र म्हणून सरकारी योजनांच्या लाभांसाठी आधारचा वापर केला जातो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला सरकारने आधार कार्ड काढून घेणं सक्तीचं केलं आहे. मतदान करण्यासाठी (Voting), पासपोर्ट (Passport), ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी, मोबाईलचं नवीन सिमकार्ड (SIM Card) घेण्यासाठी आधार कार्ड दाखवणं आवश्यक असतं. अगदी ट्रेनमध्ये प्रवास करण्यापासून ते मुलांच्या शाळा प्रवेशापर्यंत आणि बँक खातं (Bank Account) उघडण्यापासून ते शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करण्यापर्यंत सर्वत्र आधार कार्ड आवश्यक झालं आहे. आपल्याकडे फक्त आधार कार्ड असून, उपयोग नाही ते इतर अनेक कागदपत्रांशी लिंक करणंही आवश्यक आहे. ज्याप्रकारे आधार कार्ड आणि पॅन कार्ड (Pan Card) एकमेकांशी लिंक असणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे ते म्युच्युअल फंडाशीदेखील (Mutual Fund) लिंक असलं पाहिजे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Investment) करणाऱ्यांसाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जर तुम्ही तुमचं पॅन आणि आधार कार्ड लवकरात लवकर लिंक केलं नाहीत तर नंतर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. इन्व्हेस्ट केलेले पैसे परत मिळवणंही कठीण होऊ शकतं. भारतात इन्कम टॅक्स (Income Tax) नियमांनुसार, आर्थिक व्यवहारांशी (Economic Sector) संबंधित कोणतंही काम करण्यासाठी तुमचं आधार आणि पॅन कार्ड लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे. Gold Price Today: ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात वाढ; चांदीही महागली, चेक कर नवे दर आधार क्रमांकासोबत म्युच्युअल फंड लिंकिंगची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा. >> सर्वांत अगोदर म्युच्युअल फंड रजिस्ट्रारच्या ऑफिशियल वेबसाइटवर जा. >>त्यानंतर कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेसचा (CAMS) वापर करा. त्यात https://eiscweb.camsonline.com/plkyc या लिंकवर क्लिक करा. >> लिंक ओपन झाल्यानंतर ओटीपी जेनरेट मेथड सिलेक्ट करा आणि साइन इन (Sign In) ऑप्शनवर क्लिक करा. >> आता आधार सीडिंग फॉर्म भरा. हा फॉर्म भरताना पॅन कार्ड नंबरही विचारला जातो. फॉर्म भरून झाल्यानंतर तो सबमिट करा. >> मोबाईल ओटीपीद्वारे आधार ऑथेंटिकेशन पूर्ण होईल. शेवटी तुमचा म्युच्युअल फंड आधार कार्डसोबत लिंक झाल्याचा मेसेज येईल. रेल्वेतील बेशिस्त प्रवाशांचा इतरांना फटका; मुंबईतील अनेक स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरात पाच पट वाढ एसएमएसच्या मदतीनं लिंकिंग प्रोसेस तुम्ही तुमचा साधा फोन किंवा स्मार्टफोन वापरूनदेखील आधार म्युच्युअल फंड सीडिंग करू शकता. यासाठी कंपनीने निश्चित केलेल्या फॉरमॅटमध्ये मेसेज टाइप करून 9212993399 क्रमांकावर पाठवावा लागेल. एसएमएस पाठवल्यानंतर तुमच्या फोनवर एक कन्फर्मेशन मेसेजदेखील येईल. आधार कार्ड आणि म्युच्युअल फंड लिंकिंगची प्रोसेस अतिशय सोपी आहे. तुम्ही घरच्याघरी ती पूर्ण करू शकता.
First published:

Tags: Aadhar card, Investment, Money, Mutual Funds

पुढील बातम्या