• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • 35 हजार रुपये कमावणारा IT इंजिनिअर बनला शेतकरी, महिनाकाठी कमावतोय लाखो रुपये

35 हजार रुपये कमावणारा IT इंजिनिअर बनला शेतकरी, महिनाकाठी कमावतोय लाखो रुपये

आपली आयटी कंपनीतील चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि गावी जाऊन वडिलोपार्जित शेती करण्याचा निश्चय केला.

  • Share this:
हैदराबाद, 09 नोव्हेंबर:  आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचा (Farming) मोठा वाटा आहे. मात्र, शेतीमध्ये काही फायदा नाही, कष्टाच्या मानाने मोबदला फारच कमी मिळतो, अशी ओरड तरुणपिढीची आहे. त्यामुळे कमी पगाराची का होईना पण नोकरी पाहिजे, असा त्यांचा दृष्टिकोन तयार झाला आहे. हैदराबादमधील आर नंदकिशोर रेड्डी (R Nanda Kishore Reddy) हे देखील याला अपवाद नव्हते. त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयटी सेक्टरमध्ये नोकरी मिळवली. त्यांनी तीन वर्ष हैदराबादमधील एका आयटी कंपनीमध्ये (IT Company) सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत नोकरी केली. महिन्याकाठी त्यांना 35 हजार रुपये पगार मिळत होता. मात्र, काही काळ नोकरी केल्यानंतर आपल्या आयुष्यात साचलेपणा आल्याची जाणीव रेड्डी यांनी झाली. त्यांनी नोकरी सोडून काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला. आपल्याकडं एक प्रसिद्ध सुविचार आहे, 'इच्छा तिथे मार्ग'. रेड्डींना या गोष्टीचा अनुभव आला. नोकरी सोडल्यानंतर त्यांच्या समोर शेतीचा पर्याय आला आणि त्यांनी तो स्वीकारण्याचा निर्णय घेतला. सध्या रेड्डी आपल्या शेतीतून महिन्याकाठी लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवत आहेत. हेही वाचा-  पॅक केलेल्या मालाबाबत आता 1 एप्रिलपासून नवीन नियम; MRP सोबत युनिटची किंमतही लिहिणं बंधनकारक
 मार्च 2020मध्ये रेड्डी यांच्या डोक्यात शेती करण्याचा विचार आला. त्यामागे कोरोना महामारीमुळं लावण्यात आलेला लॉकडाऊन हा घटक तत्कालीन कारण ठरला. गेल्या वर्षी (2020) देशभरात लॉकडाऊन झालं होतं. या काळात अनेकांचे रोजगार गेले. अनेक कुटुंबांचे हाल झाले. आपल्या आजूबाजूची परिस्थिती पाहून रेड्डींनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी आपली आयटी कंपनीतील चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि गावी जाऊन वडिलोपार्जित शेती करण्याचा निश्चय केला.
'द बेटर इंडिया'शी बोलताना रेड्डी म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात जेव्हा लॉकडाऊन लागू झाला तेव्हा, त्यांनी लोकांना फळे, भाजीपाला आणि इतर वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करून साठवताना पाहिलं. या गोष्टीमुळं त्यांना शेतीचं महत्त्व लक्षात आलं आणि त्यांनी शेतीतूनच आपलं भविष्य घडवण्याचा निर्णय घेतला. आयटी इंजिनियर असलेल्या रेड्डींचा आणि तंत्रज्ञानाचा जवळचा संबंध होता. आपल्यातील या कौशल्याचा वापर करून त्यांनी शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली. त्यांनी पारंपरिक शेती करण्याऐवजी नवीन तंत्रज्ञान वापरून ऑरगॅनिक फार्मिंग (organic farming) सुरू केलं. हेही वाचा-  Bitcoin Price Today: बिटकॉइन 68 हजार डॉलरच्या पार, ऑल टाइम हायवर आहे ही Cryptocurrency
 सध्या नंदकिशोर रेड्डी आपल्या वडिलांसोबत शेती करतात. त्यांच्याकडे दोन एकर शेती आहे. त्यातील एक एकर क्षेत्रात त्यांनी पॉलीहाऊस तयार केलं आहे. त्यांच्या शेतामध्ये इंग्लिश काकडी (English cucumber) आणि पालक भाजीचं उत्पादन घेतलं जात आहे. दोन एकर शेतीतून त्यांनी वर्षभरात एकूण 30 टन उत्पादन घेतलं आहे. त्यापैकी काकडीचं उत्पादन 24 टन आहे तर पालक भाजीचं 6 टन. रेड्डी यांच्या शेतातील काकडी 28 रुपये प्रति किलोनं विकली गेली आहे.
पालक भाजी आणि इंग्लिश काकडी ही दोन्ही पिकं तीन महिन्यांच्या आत काढणीसाठी तयार होतात. त्यासाठी खते, मजुरी, कीटकनाशके, पॉलिहाउसची दुरुस्ती असा एकूण 5 लाख रुपये खर्च येतो तर 10 लाखांपर्यंत उत्पन्न मिळतं. याशिवाय ते शिमला मिरची, हिरवी मिरची आणि भेंडी यांसारख्या भाज्या देखील पिकवतात. आता त्यांची महिन्याची कमाई 35 हजार रुपयांवरून 3 ते 3.5 लाख रुपयांपर्यंत गेली आहे, अशी माहिती नंदकिशोर रेड्डी यांनी दिली. शेतीमध्ये येऊन झाला फायदा शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे मला शेतीतील काही गोष्टी माहीत होत्या. पण, एकदम आयटीची नोकरी सोडून पूर्णवेळ शेतीत परत येणं नक्कीच सोपं नव्हतं. माझे वडील आणि त्यांच्या मित्रानं मला सर्व शेती शिकवली. कोणत्या वेळी कोणतं पीक पेरायचं आणि त्याची कधी कापणी करायची, हे माझ्या वडिलांनी मला शिकविलं, असे रेड्डी म्हणाले. मी जवळपास 2 वर्षांपासून शेती करत आहे. कंपनीतील एसी सोडून मातीत येणं माझ्यासाठी फायद्याचं ठरलं, असेही रेड्डी म्हणाले. हेही वाचा-  शेअर सेटलमेंटसाठी आता T+1 सिस्टम लागू होणार; गुंतवणूकदांना काय फायदा होणार?
 रेड्डींनी आपल्या शेतीमध्ये ठिबक सिंचन (drip irrigation), नॉन-रेसिड्युअल फवारणी (non-residual sprayings), गादी वाफा पद्धत (raised bed system) आणि ड्रीप फर्टिगेशन (drip fertigation) यासारख्या विविध तंत्रांचा वापर केला आहे. ड्रीप फर्टिगेशन हे अत्यंत महत्त्वाचं तंत्रज्ञान आहे. ठिबक फर्टिगेशनमध्ये खत पाण्यात मिसळलं जातं. नंतर ड्रीपरद्वारे ते पिकांपर्यंत पोहचवलं जातं. त्यामुळं पाण्याचा होणारा अपव्यय टाळता येतो आणि रोपांना पाण्यासोबत आवश्यक ती पोषक तत्वेही मिळतात.
आयटीतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून पुन्हा शेतीमध्ये येऊन आर नंद किशोर रेड्डी यांनी तरुणांपुढे एक आदर्श ठेवला आहे.
Published by:Pooja Vichare
First published: