नवी दिल्ली, 30 डिसेंबर : आयकर परतावा अर्थात Income Tax Returns भरायची गुरुवारी म्हणजे 31 डिसेंबर ही शेवटची मुदत होती. पण तुमच्यापैकी ज्यांनी आर्थिक वर्ष 2019-2020 साठीचे टॅक्स रिटर्न्स अद्याप फाइल केले नसतील, तर एक दिलासादायक बातमी आहे. आयकर विभागाने IT Returns भरायची मुदत (Deadline)पुन्हा एकदा 10 दिवसांनी वाढवली आहे.
आता वैयक्तिक आयकर परतावा भरण्याची मुदत 10 जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या वर्षी Coronavirus च्या साथीमुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. सगळं अर्थचक्रच काही काळ थांबलं होतं. त्यामुळे दरवर्षी जून-जुलैमध्ये भरले जाणारे टॅक्स रिटर्न्स या वेळी डिसेंबरपर्यंत लांबले. आता थेट 2021 च्या 10 जानेवारीपर्यंत मुदत गेल्या आर्थिक वर्षाचे रिटर्न्स फाइल करण्यासाठी देण्यात आली आहे.
एप्रिलपासून तुमच्या हातात येणारा पगार कमी होण्याची शक्यता, काय आहे सरकारची योजना
सुरुवातीला 31 जुलै 2020 ही या वर्षीचा (assessment year 2020-21) ITR भरण्याची शेवटची मुदत ठरवून देण्यात आली होती. पण Covid-19 च्या संकटामुळे ती नोव्हेंबर अखेरपर्यंत वाढवण्यात आली. पण पुन्हा ती वाढवून 31 डिसेंबर करण्यात आली आणि आता ती आणखी 10 दिवसांनी वाढवून देण्यात आली आहे.
#AwaazStory | इनकम टैक्स रिटर्न फाइलिंग की डेडलाइन को बढ़ाया गया @RoyLakshman से जानिए नई तारीख | @IncomeTaxIndia #ITR #AY2021 pic.twitter.com/Ljsqq8H6Of
— CNBC-AWAAZ (@CNBC_Awaaz) December 30, 2020
IT रिटर्न भरताना कशाप्रकारे कराल ई-व्हेरिफिकेशन? वाचा सविस्तर
ज्या करदात्यांची अकाउंट्स ऑडिट करून फाइल करायची आहेत त्यांच्यासाठी(including their partners ,who are required to get their accounts audited)ITR फाइल करण्याची मुदत आता 15 फेब्रुवारी असेल.
वस्तू आणि सेवा कर कायद्या अंतर्हत येणारी वार्षिक टॅक्स रिटर्न्स भरायची मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.