ISRO Recruitment 2019 : बारावी झालेल्यांना ISRO मध्ये मिळू शकते चांगल्या पगाराची नोकरी, असा करा अर्ज

ISRO Recruitment 2019 : बारावी झालेल्यांना ISRO मध्ये मिळू शकते चांगल्या पगाराची नोकरी, असा करा अर्ज

भारतीय अवकाश संशोधन संस्थेत म्हणजे ISRO मध्ये काम करायची संधी मिळणार आहे. बारावी, आयटीआय झालेले तरुण अर्ज करू शकतात. 25000 पेक्षा जास्त मिळू शकतो पगार. अर्ज कसा करायचा, कधी करायचा?

  • Share this:

बंगळुरू, 13 जून : भारतीय अवकाश संशोधन संस्थेत म्हणजे ISRO मध्ये काम करायची संधी मिळणार आहे. इस्रोने त्यांच्या बेंगळुरू आणि तिरुवनंतरपुरम कार्यालयातल्या 41 जागा भरण्यासाठी जाहिरात दिली आहे. Propulsion Systems Unit मध्ये ही नोकरभरती होणार आहे. फक्त बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांनाही या जागांसाठी अर्ज करता येणार आहे. तंत्रज्ञ आणि ड्रॉट्समन Technician and Draughtsman in B-level, and catering attendant ही पदं भरायची आहेत. आयटीआय केलेल्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. थेट देशाच्या अवकाश संशोधन संस्थेसाठी ते काम करू शकतात.

या जागांसाठी वयाची 25 वर्षं पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. 25 ते 35 वयोगटातले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. OBC, SC कॅटेगरीतल्या उमेदवारांसाठी वयाची अट शिथील करण्यात आली आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याची पद्धत इस्रोच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.  त्यासाठी www.lpsc.gov.in या वेबसाईटवर फॉर्म उपलब्ध असतील.  18 जूनपासून अर्जाची लिंक खुली होईल. अर्ज करण्याची शेवटची मुदत 2 जुलै आहे.

इंडिगोच्या धमाकेदार ऑफर्स, स्वस्तात करा परदेशवारी

ISRO सारख्या मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या संस्थेत काम करण्याची ही मोठी संधी आहे. या संस्थांमध्ये काम करण्यासाठी उच्चशिक्षित उमेदवार लागतात. मात्र बारावी, आयटीआय झालेल्यांना ही चांगली संधी आहे.चांद्रयान2 या प्रतिष्ठेच्या आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे ISRO कडे जगभरातल्या वैज्ञानिकांचं लक्ष लागलेलं आहे. भारताच्या प्रगतीमध्ये या संस्थेचा मोलाचा वाटा आहे.

GST काउन्सिलची बैठक 20 जूनला, 'या' वस्तू होणार स्वस्त

या दोन्ही पदांसाठी पगारही चांगला मिळणार आहे. सरकारी संस्थेचे सर्व नियम इथे असतील.Technician and Draughtsman पदांसाठी 21700 - 69100 रुपये एवढा पगार असेल, असं जाहीर करण्यात आलं आहे. केटरिंग अटेंडंट आणि ड्रायव्हर या पदांसाठीसुद्धा अर्ज मागवण्यात येणार आहेत. या पदांसाठीसुद्धा 20000 च्या वर पगार मिळणार आहे. केटरिंग असिस्टंट पदासाठी Rs. 18,000 – 56, 900 ही पगाराची रेंज सांगण्यात आली आहे.

ताडोबामध्ये वाघाच्या 4 बछड्यांच्या डौलदार लीला, VIDEO व्हायरल

First published: June 13, 2019, 3:44 PM IST
Tags: isrojobs

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading