मराठी बातम्या /बातम्या /मनी /ISGEC ठरला 2021मध्ये सर्वात जास्त रिटर्न देणारा शेअर; 1 लाख रुपयाचे बनवले तब्बल 4 कोटी

ISGEC ठरला 2021मध्ये सर्वात जास्त रिटर्न देणारा शेअर; 1 लाख रुपयाचे बनवले तब्बल 4 कोटी

 2021 मध्ये शेअर बाजारात  (Share Market Investment)  अनेक स्टॉक मल्टिबॅगर  (Multibagger) असल्याचं सिद्ध झालं आहे. पण आज आम्ही तुम्हाला ज्या स्टॉकबद्दल सांगणार आहोत, त्याने इतका रिटर्न ( return ) दिला आहे की त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे.

2021 मध्ये शेअर बाजारात (Share Market Investment) अनेक स्टॉक मल्टिबॅगर (Multibagger) असल्याचं सिद्ध झालं आहे. पण आज आम्ही तुम्हाला ज्या स्टॉकबद्दल सांगणार आहोत, त्याने इतका रिटर्न ( return ) दिला आहे की त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे.

2021 मध्ये शेअर बाजारात (Share Market Investment) अनेक स्टॉक मल्टिबॅगर (Multibagger) असल्याचं सिद्ध झालं आहे. पण आज आम्ही तुम्हाला ज्या स्टॉकबद्दल सांगणार आहोत, त्याने इतका रिटर्न ( return ) दिला आहे की त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे.

पुढे वाचा ...

     मुंबई, 31 डिसेंबर-    2021 मध्ये शेअर बाजारात  (Share Market Investment)  अनेक स्टॉक मल्टिबॅगर  (Multibagger) असल्याचं सिद्ध झालं आहे. पण आज आम्ही तुम्हाला ज्या स्टॉकबद्दल सांगणार आहोत, त्याने इतका रिटर्न ( return ) दिला आहे की त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. या शेअरने सुमारे 40,000 टक्के रिटर्न दिला आहे. त्यामुळे याला कदाचित मल्टिबॅगर म्हणणंही योग्य ठरणार नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात रिटर्न देणाऱ्या या स्टॉकचे नाव आयएसजीईसी हेवी इंजिनीअरिंग लिमिटेड (ISGEC Heavy Engineering Ltd.) आहे.

    गुरुवारी (30 डिसेंबर 21) हा स्टॉक 603 रुपये 20 पैसे किंमतीवर बंद झाला. आज हा स्टॉक 2.68 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, या शेअरची किंमत वर्षभरापूर्वी 1.55 रुपये होती. त्यानुसार हिशोब केला तर एका वर्षात या शेअरमध्ये 38848 टक्के वाढ होते. याचाच अर्थ जर एखाद्याने वर्षभरापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 3 कोटी 88 लाख 48 हजार रुपये झाले असते. 10 हजार रुपये गुंतवले असते तर त्याचे 38 लाख रुपये झाले असते.

    पन्नास हजार टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न-

    आयएसजीईसी कंपनीच्या शेअरच्या मागील 52 आठवड्यांतील किंमतीचा अभ्यास केला, तर शेअरची सर्वात जास्त किंमत ही 878.35 रुपये नोंदवली गेली आहे, जुलै 2021 मध्ये हा शेअर या किंमतीवर गेला होता. सध्या तो 603 रुपयांपर्यंत खाली आला आहे. मात्र, शेअरने गाठलेल्या सर्वात जास्त किंमतीचा विचार करून रिटर्न काढला तर तो तब्बल 56568 टक्के होतो. या कंपनीची मार्केट कॅप सध्या 4440.45 कोटी आहे. कंपनीचे 62.43 टक्के शेअर्स तिच्या प्रोमोटरकडे आणि 28.59 टक्के नॉन-इंस्टिट्यूशन्सकडे आहेत. काही मोठ्या म्युच्युअल फंडांनीही या स्टॉकमध्ये 6.68 टक्के गुंतवणूक केली आहे.

    काय करते कंपनी ?

    आयएसजीईसी हेवी इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, कंपनीची स्थापना 1933 मध्ये झाली होती. तेव्हा तिचे नाव सरस्वती शुगर सिंडिकेट (Saraswati Sugar Syndicate) होते. कंपनीचे मुख्यालय नोएडा येथे आहे. ही कंपनी एक मल्टिप्रॉडक्ट, मल्टिलोकेशन पब्लिक कंपनी असून गेल्या 88 वर्षांपासून जगभरातील ग्राहकांना इंजिनीअरिंग सोल्यूशन्स देत आहे. ही कंपनी ET 500 लिस्टिंगमध्ये 252 व्या आणि फॉर्च्यून इंडिया 500 (Fortune India 500) लिस्टिंगमध्ये 253 व्या क्रमांकावर आहे. जगभरातील 91 देशांमध्ये या कंपनीचे ग्राहक आहेत.

    शेअर बाजारात गुंतवणूक करताना योग्य स्टॉक निवडणं मोठं कठीण काम आहे. पण असे काही स्टॉक आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना कमी वेळेत मोठी कमाई करुन दिली आहे. आयएसजीईसी कंपनीचा स्टॉक तसाच ठरला असून या स्टॉकमध्ये वर्षभरापूर्वी ज्यांनी एक लाख रुपये गुंतवले होते, ते आज करोडपती झाले आहेत.

    First published:

    Tags: Money, Share market