Home /News /money /

मोदी सरकार देशातील बेरोजगारांना खरंच 3800 रुपये भत्ता देत आहे? जाणून घ्या काय आहे सत्य

मोदी सरकार देशातील बेरोजगारांना खरंच 3800 रुपये भत्ता देत आहे? जाणून घ्या काय आहे सत्य

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, मोदी सरकार (Modi Government) देशातील युवकांना आणि बेरोजगारांना (unemployed) 3800 रुपये प्रतिमहिना भत्ता (3,800 Rs per month allowance) देत आहे.

  नवी दिल्ली, 29 जानेवारी: सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यात, मोदी सरकार देशातील युवकांना आणि बेरोजगारांना 3800 रुपये प्रतिमहिना भत्ता देत आहे, असा  दावा केला जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक लिंकही दिली आहे. या लिंकच्या माध्यमातून या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यास सांगितलं जात आहे. परंतु सरकारने हा दावा बनावट, खोटा असल्याचं जाहीर केलं आहे. सरकारने याप्रकरणी कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. काय लिहिलं आहे पोस्टमध्ये? सोशल मीडियावर फॉरवर्ड केल्या जाणाऱ्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज देवू शकता. या योजनेंतर्गत देशातील युवकांना आणि बेरोजगारांना 3800 रुपये प्रतिमहिना देण्याचा दावाही केला जात आहे. 18 ते 50 वयोगटातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेवू शकतात, असंही या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे. नोंदणी करण्यासाठी  http://bit.ly/pradhanmantrI-berojgar-bhatta-yojnaa ही लिंक देण्यात आली आहे. त्याच बरोबर लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी या पोस्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोही टाकला आहे. (वाचा - MMRC RECRUITMENT: मेट्रोमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख) काय आहे सत्य - खरंतर, पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेच्या लिंकमध्ये https://www.hubbyhubby.Live/ या वेबसाइटची लिंक दडलेली आहे. ही मूळ वेबसाइट लपवण्यासाठी किंवा लिंक शॉर्ट करण्यासाठी 'बिटली.कॉम' नावाच्या लिंक शॉर्ट करणाऱ्या वेबसाइटची मदत घेतली जाते. संबंधित पोस्टमध्ये पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेचं नाव वापरण्यात आलं आहे. मात्र तपासणीत ही पोस्ट आणि त्यातील लिंक पूर्णपणे बनावट असल्याचं समोर आलं आहे.

  (वाचा - खूशखबर! HCL मध्ये मिळवा नोकरी, या तारखांना होणार व्हर्च्यूअल नोकरभरती)

  कशी टाळाल फसवणूक? सायबर तज्ज्ञांनी असं नमूद केलं आहे की, ज्या वेबसाइटचा यूआरएल http: // ने सुरू होतो, अशी वेबसाइट असुरक्षित असते. अशा लिंकवर क्लिक केल्यास सायबर हल्लेखोर तुमच्या सिस्टमवर किंवा मोबाईलवर हल्ला करू शकतात आणि तुमची गोपनीय माहिती चोरू शकतात. याउलट ज्या वेबसाइटची सुरूवात https: // ने सुरू होते, अशा वेबसाइट्स सुरक्षित असतात. त्यामुळे एखाद्या बँक, वित्तीय संस्थेच्या नावाने तुम्हाला बनावट मेल येऊ शकतात. अशावेळी संबंधित लिंकवर क्लिक न करता, थेट बॅंकेच्या संकेतस्थळावर जावे आणि आपल्याला हवी ती माहिती मिळवावी. अन्यथा जवळच्या बॅंक शाखेशी संपर्क साधून शंकेचं निरसण करावं.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Unemployment

  पुढील बातम्या