मराठी बातम्या /बातम्या /मनी /

ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डशी लिंक केलं का..., अन्यथा होईल मोठं नुकसान!

ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डशी लिंक केलं का..., अन्यथा होईल मोठं नुकसान!

तुम्हीही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डसोबत जोडून घ्या. जेणेकरून बनावट लायसन्स आणि इतर गोष्टींचा त्रास होणार नाही. कोणत्याही प्रकारची फसवणूक होण्यापासून आपलं संरक्षण होईल.

  • Published by:  Meenal Gangurde

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) आणि आधार कार्ड (Aadhaar card) ही दोन अत्यंत महत्त्वाची कागदपत्रं आहेत. आधार कार्डशिवाय कोणतंही सरकारी काम करू शकत नाही. कोणत्याही सरकारी योजनेचा (government scheme) लाभही घेता येत नाही. तसंच ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) हे  वैध ओळखपत्र मानले जाते. आणि त्याच्याशिवाय गाडी चालवणे हा कायदेशीर गुन्हा आहे. मात्र आपल्या देशात बनावट ड्रायव्हिंग लायसन्स वापरून गाडी चालवणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. तसंच बनावट लायसन्स देऊनही अनेकदा फसवणूक केली जाते. हे सगळं रोखण्यासाठी सरकारनं आता ड्रायव्हिंग लायसन्सही आपल्या आधार कार्डशी (Aadhaar card) जोडण्याचा आदेश दिला आहे. लायसन्स आधार कार्डसोबत लिंक केल्यास बनावट लायसन्स (fake License) बद्दल माहिती मिळवणं सोपं होईल. तसेच तुम्हालाही तुमच्या लायसन्स बद्दलची योग्य माहिती मिळेल, असं केंद्र सरकारचं (central government) म्हणणं आहे.

या आधी आपण आपलं आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी (Bank account) लिंक केलं आहे. आता आपलं ड्रायव्हिंग लायसन्सदेखील आधार कार्डसोबत लिंक करायचं आहे. यामुळे आपल्यालाच फायदा होणार असून, ही प्रक्रियाही अगदी सोपी आहे.

हे ही वाचा-PF खातेधारकांसाठी कामाची बातमी; केवळ मिस्ड कॉल देऊन बॅलेन्स घ्या जाणून

ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार लिंक करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या राज्याच्या परिवहन विभागाच्या https://parivahan.gov.in या वेबसाइटवर जावं लागेल. त्यानंतर 'Link Aadhaar' च्या ऑप्शनवर क्लिक करा. नंतर ड्रॉप-डाउनमध्ये जाऊन 'Driving License ' च्या ऑप्शनवर क्लिक करा. इथं तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर (driving License number) मागितला जाईल. तो नंबर तिथे टाका.

ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्यासमोर ‘Get Details’ हा ऑप्शन येईल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि मोबाइल नंबर टाकावा लागेल. दोन्ही नंबर टाकल्यावर ‘Submit’चा ऑप्शन असेल. तिथं क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाइल वर एक OTP येईल. हा ओटीपी भरल्यानंतर तुमचे लायसन्स तुमच्या आधार कार्डसोबत लिंक होईल.

First published:

Tags: Aadhar card, Aadhar card link, Driving license