Home /News /money /

सर्वोच्च स्तरापेक्षा 8000 रुपयांनी स्वस्त आहेत सोन्याचे दर, गुंतवणुकीसाठी योग्य वेळ?

सर्वोच्च स्तरापेक्षा 8000 रुपयांनी स्वस्त आहेत सोन्याचे दर, गुंतवणुकीसाठी योग्य वेळ?

Gold Price Today: देशात बुधवारी 23 जून रोजी सोन्याचे दर (Gold Prices) स्थिर पातळीवर होते. मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) मात्र सोन्याच्या वायदा व्यवहारात 0.18 टक्क्यांनी वाढ झाली आणि सोन्याचे दर प्रती दहा ग्रॅमसाठी 47 हजार 097 रुपयांवर गेले, तर चांदीच्या किंमतीतही किरकोळ वाढ झाली.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 24 जून: देशात बुधवारी 23 जून रोजी सोन्याचे दर (Gold Prices) स्थिर पातळीवर होते. मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर (MCX Multi Commodity Exchange) मात्र सोन्याच्या वायदा व्यवहारात 0.18 टक्क्यांनी वाढ झाली आणि सोन्याचे दर प्रती दहा ग्रॅमसाठी 47 हजार 097 रुपयांवर गेले, तर चांदीच्या किंमतीतही किरकोळ वाढ झाली. चांदीच्या वायदे किंमतीत 0.28 टक्क्यांनी वाढ होऊन चांदीचा दर 67 हजार 747 रुपये झाला. अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे (US Federal Reserve) अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी आणखी काही काळ व्याजदर (Interest Rate) शून्याजवळ ठेवण्याची घोषणा केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत बुधवारी वाढ झाली. सोन्याची वायदे किंमत प्रति औंस 0.2 टक्क्यांनी वाढून 1781.18 डॉलर्सवर गेली आहे. तर डॉलर निर्देशांक 0.1 टक्क्यानं वाढला. फेडरल रिझर्व्हचे (US Federal Reserve) अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदरात वाढ न करण्याचं धोरण स्पष्ट केलं. त्याला बाजारांनी किरकोळ प्रतिसाद दिला. या घोषणेनंतरही बाजाराचा कल घसरणीचा राहिला, असं रिलायन्स सिक्युरिटीजचे (Reliance Securities) वरिष्ठ संशोधन विश्लेषक श्रीराम अय्यर यांनी सांगितलं. अमेरिकेन फेडरल रिझर्व्हची ही भूमिका बाजाराला अपेक्षित अशीच होती, त्यात नवीन काहीच नसल्यानं बाजारात त्याला थंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात बुधवारी फारसे चढ-उतार झाले नाहीत. आता पुढचे काही दिवस आकडेवारीकडे बाजाराचे लक्ष असेल, त्या अनुषंगानं घडामोडी घडतील, असंही अय्यर यांनी स्पष्ट केलं. हे वाचा-नोकरी गेली तरी नो टेन्शन! ESIC च्या या स्कीममधून मिळेल आर्थिक मदत, वाचा सविस्तर 'तांत्रिकदृष्ट्या, एलबीएमए गोल्ड स्पॉट 1760-1770 डॉलर्सच्या सपोर्ट झोनवरुन उसळी घेत 1780 डॉलर्सच्या पातळीवर पोहोचला आहे, मात्र 1790 ते 1808 डॉलर्सच्या पातळीजवळ त्याला अडथळा आहे. एलबीएमए सिल्व्हर 200च्या डेली मूव्हिंग अॅव्हरेजवरून उसळी घेत 25.70 डॉलर्सच्या पातळीवर गेला आहे. तो पुढं 26.30 ते 27.50 डॉलर्सची पातळी गाठू शकतो. त्याला 25.50 -24.90 डॉलर्स या पातळीवर सपोर्ट मिळू शकतो,' असंही अय्यर यांनी स्पष्ट केलं. 'देशांतर्गत बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किंमतीत बुधवारी फारसे चढ-उतार झाले नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतींच्या आसपासच त्या राहिल्या. एमसीएक्स गोल्ड ऑगस्टला 100 डेली मुव्हिंग अॅव्हरेजजवळ सपोर्ट असल्यानं सोन्याच्या किमती 46,900च्या पातळीवर आहेत. त्यात वाढ होऊन त्या 47,200 ते 47,350 पर्यंत वाढू शकतात. एमसीएक्स सिल्व्हर जुलैला जवळपास 67000 ते 65,900 रुपयांच्या पातळीवर आधार आहे. त्याला 68,700 ते 69,800च्या पातळीवर दबाव आहे,' असंही अय्यर म्हणाले. हे वाचा-या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घरासाठी पुढील वर्षापर्यंत मिळणार अ‍ॅडव्हान्स 'तांत्रिकदृष्ट्या, ऑगस्टमधील सोन्याची वायदे किंमत नजीकच्या काळात फार तेजी दर्शवत नाहीत. दररोजच्या बार चार्टवर तीन आठवड्यांपूर्वीच्या किंमतीतही घट होत असल्याचं दिसत आहे. 1826.40 डॉलर्सच्या पातळीवर सपोर्ट मिळाला तर सोन्याचे दर वाढतील. 1700 डॉलर्सवरून किमती खाली आल्या तर किमतीत घट होईल. आजच्या उच्चांकी 1790.10 डॉलर्स आणि नंतर 1800 डॉलर्सवर अडथळा आल्याचं दिसून आलं. गेल्या आठवड्यात नीचांकी 1761.20 डॉलर्सच्या पातळीवर आधार मिळाला होता, त्यानंतर 1750 डॉलर्सवर आधार मिळाला,' असं गंगानगर कमोडिटीज लिमिटेडच्या (Ganganagar Commodities Ltd) संशोधन विभागाचे सहउपाध्यक्ष अमित खरे यांनी सांगितलं. 'चांदीच्या जुलैमधील वायदे किंमतीचा कल घसरणीचा होता. त्यामुळं चार आठवड्यांच्या घसरणीचा कल दररोजच्या बार चार्टवर दिसून आला. चांदीच्या किमतीतील वाढीला प्रति औंस 27 डॉलर्सवर तांत्रिक अडथळा असून, नीचांकी पातळीवर 25 डॉलर्सवर अडथळा आहे. या आठवड्यात आधी उच्चांकी 26.135 डॉलर्सवर आणि नंतर 26.555 डॉलर्सवर अडथळा दिसून आला. चांदीच्या किमतीला या आठवड्यातील सर्वात कमी 25.58 डॉलर्स आणि नंतर 25 डॉलर्सवर आधार मिळेल, अशी अपेक्षा आहे,' असं खरे यांनी सांगितलं. 'सोने आणि चांदीच्या किमतीत दररोज सुधारणा होत आहे. मोमेंटम इंडिकेटर आरएसआय सकारात्मक संकेत देत आहे. त्यामुळं व्यापाऱ्यांनी चांदी आणि सोन्यातील गुंतवणूक दीर्घकाळासाठी करावा असा सल्ला आहे. चांदी आणि सोन्याच्या दरातील खाली दिलेल्या तांत्रिक पातळीवर लक्ष केंद्रित करावं. हे वाचा-जुलैमध्ये 15 दिवस बंद राहतील बँका, कामाचा खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा यादी ऑगस्ट सोन्याची क्लोजिंग प्राइस 47,011 रुपये, सपोर्ट 1 – 46,750 रुपये, सपोर्ट 2 – 46,500 रुपये, अडथळा 1- 47,250 रुपये, अडथळा 2 – 47,500 रुपये. जुलै चांदीची क्लोजिंग प्राइस 67,515 रुपये. सपोर्ट 1- 67,000 , सपोर्ट 2- 66,500रुपये, अडथळा 1 – 68,100, अडथळा 2- 68,720 रुपये.’ असं खरे यांनी स्पष्ट केलं.
First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today

पुढील बातम्या