मुंबई, 08 ऑगस्ट : इन्शुरन्स, म्हणजेच विमा असणं एक चांगली गोष्ट आहे. पण कित्येक वेळा आपला आधीपासून एकच विमा असल्यामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे आपल्याला विमा नको असतो. अशातच, स्टेट बँक ऑफ इंडियातील अधिकारी बचत खाते उघडताना इन्शुरन्स पॉलिसी (SBI insurance mandatory) घेणं अनिवार्य करत असल्याचं ग्राहकांचे म्हणणं आहे. कित्येक ग्राहकांनी याबाबत तक्रार केल्यानंतर (SBI customer complaints) अखेर बँकेने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. बचतखाते उघडताना इन्शुरन्स घेण्याचा पर्याय बँक देत असली, तरी तो अनिवार्य नसल्याचे (SBI Insurance not mandatory) एसबीआयने आपल्या ट्विटमधून (SBI twitter) स्पष्ट केले आहे.
एका ट्विटर यूझरने एसबीआयकडे अशीतक्रार केली होती, की म्हैसूरमधील एका एसबीआय ब्रँचमध्ये त्याच्या मुलाला बचत खात्यासोबत ‘प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना’ आणि ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना’ या योजना घेणं अनिवार्य (Insurance Mandatory with SB account) असल्याचं सांगण्यात आलं होतं. एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याला उत्तर देत, या योजना अनिवार्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यासोबतच एसबीआयने इतरही नियम (SBI Insurance Policy rules) स्पष्ट केले आहेत, याबद्दल TV9 हिंदीने वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
इन्शुरन्स आणि इतर योजना या पूर्णपणे ऐच्छिक आहेत. या सोबतच एसबीआयने हे देखील स्पष्ट केले की, 'गृहकर्ज घेतानाही बँकेकडून इन्शुरन्सबाबत सल्ला दिला जातो. यात प्रॉपर्टी इन्शुरन्स (Property Insurance) आणि ऋण रक्षा विमा (Rinn Raksha Insurance) यांचा समावेश आहे. यातील प्रॉपर्टी इन्शुरन्स हा अनिवार्य (Property Insurance mandatory) असतो, तर दुसरा इन्शुरन्स ऐच्छिक असतो असं बँकेने स्पष्ट केलं. ऋण रक्षाविमा हा एक प्रकारचा प्रोटेक्शन प्लॅन असतो, ज्याच्या द्वारे लोनच्या लाएबलिटीला (Loan Liability) कव्हर केले जाते. दुर्दैवाने कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला काही झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबावर कर्जाचा बोजा पडू नये, यासाटी हा विमा आवश्यक असतो.
एकंदरीत, प्रॉपर्टी इन्शुरन्स वगळता अन्य कोणताही इन्शुरन्स घेणं बँकेच्या ग्राहकांना बंधनकारक नसते. केवळ ग्राहकांना माहिती असावी यासाठी या योजनांची (SBI Insurance policies) माहिती दिली जाते. बँकेच्याव्यवहारांसंबधी कोणतीही तक्रार वा अडचण असल्यास तुम्ही आपला मोबाईल नंबर, पत्ता, तुमची अडचण, बँकेच्याशाखेचं नाव, ब्रँच कोड अशी माहिती socialconnect@sbi.co.in या ईमेल आयडीवर पाठवू शकता, असंही एसबीआयनेआपल्या ट्विटमध्ये सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.