Home /News /money /

लोखंड आणि स्टीलच्या 11 उत्पादनांवर निर्यात शुल्क लागू, कच्च्या मालावरील आयात शुल्कात कपात

लोखंड आणि स्टीलच्या 11 उत्पादनांवर निर्यात शुल्क लागू, कच्च्या मालावरील आयात शुल्कात कपात

स्थानिक बाजारात लोहखनिजाची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने एका वस्तूवर निर्यात शुल्क वाढवलं आहे. तर 10 उत्पादनांवर नव्याने आकारणी केली आहे.

  नवी दिल्ली, 22 मे : अर्थ मंत्रालयाने शनिवारी लोखंड आणि स्टीलच्या (Iron and Steel) 11 उत्पादनांवर निर्यात शुल्क (Export Duty) लागू करण्यात आलं आहे. तसंच स्टील उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या तीन प्रमुख कच्च्या मालावर आणि प्लास्टिकच्या वस्तूंच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या तीन उत्पादनांवर आयात शुल्क (Import Duty) कमी करण्यात आले आहे. कच्च्या मालाच्या एकूण सहा उत्पादनांवर आयात शुल्क कमी करण्यात आलं आहे. नवे दर रविवारी 22 मे पासून लागू होणार आहेत. देशात बनवल्या जाणाऱ्या स्टील उत्पादनांची प्रोडक्शन कॉस्ट कमी करण्यासाठी कोकिंग कोल आणि एन्थ्रेसाइटवरील आयात शुल्क 2.5 टक्क्यांनी कमी करुन शून्य करण्यात आलं आहे. कोक आणि सेमी-कोकवरील आयात शुल्क 5 टक्क्यांनी कमी करुन शून्य करण्यात आलं आहे. लोखंड आणि निकेलपासून बनवलेल्या मिश्र धातूच्या फेरोनिकलवरील आयात शुल्क 2.5 टक्क्यांवरुन शून्यावर आणण्यात आलं आहे. स्थानिक बाजारात लोहखनिजाची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने एका वस्तूवर निर्यात शुल्क वाढवलं आहे. तर 10 उत्पादनांवर नव्याने आकारणी केली आहे. लोहखनिज आणि त्याच्या कॉन्स्नट्रेट्सवर निर्यात शुल्क 30 टक्क्यांवरुन 50 टक्के करण्यात आलं आहे. 58 टक्क्यांपेक्षा जास्त लोह सामग्री असलेल्या सर्व उत्पादनांवर हे निर्यात शुल्क लागू होईल.

  हे वाचा - Petrol Diesel Prices: पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी झाल्यानंतर तपासा मुंबईतील आजचा भाव

  लोखंड आणि प्लेट्सवर 45 टक्के निर्यात शुल्क लावण्यात आलं आहे. आतापर्यंत यावर कोणतीही ड्यूटी लावण्यात आली नव्हती. लोखंड आणि नॉन-अलॉय स्टीलच्या शीट्सवरही 15 टक्के निर्यात शुल्क लावण्यात आलं आहे. प्लॅस्टिक उप्तादनांच्या देशांतर्गत उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी नेफ्थावरील आयात शुल्क 2.5 टक्क्यांवरुन 1 टक्क्यापर्यंत कमी केलं आहे. तसंच फर्निचरमध्ये फोमच्या निर्मिती वापरल्या जाणाऱ्या प्रोपीलीन ऑक्साइडवरील आयात शुल्क 2.5 टक्के करण्यात आलं आहे. दरम्यान, केंद्र सरकारने पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क (Excise Duty) प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी केलं आहे. याचा परिणाम पेट्रोल-डिझेल दर कमी झाला आहे.
  Published by:Karishma
  First published:

  पुढील बातम्या