मुंबई, 18 जानेवारी : जर तुम्ही ट्रेननं प्रवास करत असाल आणि तुमच्याकडे कन्फर्म ट्रेन तिकीट असेल, तर तुम्ही फक्त 40 रुपयांमध्ये एका आलिशान खोलीत 48 तास राहू शकता. भारतीय रेल्वेच्या रिटायरिंग रूममध्ये तुम्हाला लक्झरी हॉटेलच्या सर्व सुविधा मिळतात. ही सुविधा तुम्हाला बहुतांश प्रमुख स्थानकांवर मिळेल. हिवाळ्यात अनेकदा गाड्या उशिरानं धावतात. त्यामुळे प्रवाशांना मोठी वाट पहावी लागत आहे. अनेक प्रवाशांना थंडीमुळे जीवही गमवावा लागत आहे. पण आता असं होणार नाही. कारण प्रवाशांची सोय लक्षात घेऊन आयआरसीटीसीने ही सेवा सुरू केली आहे.
भारतीय रेल्वेनं आपल्या प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेऊन लक्झरी रिटायरिंग रूम तयार केल्या आहेत. ही खोली बुक करण्यासाठी तुमच्याकडे PNR नंबर असणे आवश्यक आहे. रेल्वेच्या रिटायरिंग रूममध्ये तुम्हाला ही सुविधा मिळते. या खोलीत तुम्ही 48 तास ट्रेनची वाट पाहू शकता. इथे तुमच्याकडून फक्त 20-40 रुपये घेतले जातील.
प्रमुख स्थानकांवर रिटायरिंग रूमची सुविधा-
नवी दिल्ली, मुंबई, पुणे अशा सर्व प्रमुख स्थानकांवर रिटायरिंग रूमची सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या तिकिटाचा PNR नंबर वापरून या खोल्या बुक करू शकता. तुम्ही तुमच्या सोयीनुसार एसी आणि नॉन एसी रूम बुक करू शकता. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सेवानिवृत्त खोलीचे वाटप केले जाईल. जर रिटायरिंग खोल्या भरल्या असतील तर तुमचं नाव प्रतीक्षा यादीत असेल आणि खोल्या रिकाम्या होताच तुमचं बुकिंग अपग्रेड केलं जाईल.
हेही वाचा: भारतात वाढणार Apple iPhone चे उत्पादन! जगातील 50% iPhone होतील तयार
अशी बुक करा रिटायरिंग रूम -
50 रुपयांत पंचतारांकित -
रेल्वे स्थानकावर ट्रेन लेट किंवा रद्द झाल्यास आता प्रवाशांना कडाक्याच्या थंडीत प्लॅटफॉर्मवर उभं राहून थांबावं लागणार नाही. भारतीय रेल्वेनं प्रवाशांसाठी खास सुविधा आणली आहे. आता तुम्ही फक्त 40 रुपयांमध्ये रिटायरिंग रूम बुक करू शकता. रेल्वेच्या रिटायरिंग रूममध्ये कोणत्याही हॉटेलपेक्षा कमी सुविधा नाहीत. या रिटायरिंग रूम्स किमान 3 तास आणि जास्तीत जास्त 48 तासांसाठी बुक केल्या जाऊ शकतात. यामध्ये एसी डिलक्स, एसी आणि नॉर्मल रूमचा पर्यायही देण्यात आला आहे. सिंगल प्रवाशांसाठी सिंगल बेडरूम आणि डबल प्रवाशांसाठी डबल बेडरूमची व्यवस्था आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway, IRCTC