आधार कार्डाच्या मदतीनं 'अशी' बुक करा ट्रेनची तिकिटं, 'असा' होतो फायदा

आधार कार्डाच्या मदतीनं 'अशी' बुक करा ट्रेनची तिकिटं, 'असा' होतो फायदा

IRCTC, Train Booking - तुम्हाला एका वेळी बरीच ट्रेनची तिकिटं बुक करायची असतील तर जाणून घ्या त्याबद्दल

  • Share this:

मुंबई, 13 ऑगस्ट : ट्रेननं प्रवास करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आधार कार्डामुळे ट्रेननं प्रवास करणं आता सोपं होणार आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम काॅर्पोरेशन ( IRCTC ) ट्रेन बुकिंगसाठी आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी 12 तिकिटं बुक करण्याची सुविधा देणार आहे. ट्रेनची तिकिटं बुक करायची असतील तर आधार कार्ड आवश्यक नाही. पण आधार कार्डाशिवाय 6 तिकिटंच बुक करता येतात.

आधार कार्डाद्वारे कशी बुक करायची तिकिटं?

IRCTC द्वारे तुमचा आधार नंबर लिंक करण्यासाठी युजरला IRCTC अकाउंटमध्ये जावं लागेल.

त्यानंतर माय प्रोफाइलमध्ये जाऊन आधारवर क्लिक करावं लागेल.

घरी ठेवलेल्या सोन्यातून करा मोठी कमाई, 'ही' आहे SBI ची स्कीम

त्यानंतर आधार कार्ड ज्या मोबाइलला लिंक असेल त्यावर ओटीपी येईल.

तो ओटीपी आयआरसीटीसीमध्ये अॅड करावा लागेल.

अशा प्रकारे आधार नंबर IRCTC अकाउंटला लिंक होईल.

त्यानंतर तुम्ही महिन्यात 12 तिकिटं बुक करू शकता.

तात्काळ तिकीट बुकिंग

पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, जाणून घ्या तुमच्या शहरातल्या किमती

तुम्ही तात्काळ तिकीट बुकिंग 1 दिवस आधी करू शकता. एसी क्लासचं तिकीट सकाळी 10 वाजल्यापासून तर नाॅन एसी सकाळी 11 वाजल्यापासून बुक करता येतं. या तिकिटासाठी कमीत कमी 100 रुपये आणि जास्तीत जास्त 200 रुपये पडतात. https://www.irctc.co.in या वेबसाइटवर किंवा बुकिंग विंडोवर तिकीट बुक करता येतं.

ट्रेन तिकीट रद्द करण्याचे नियम

1. चार्ट तयार झाल्यावर 48 तास आधी तिकीट रद्द केलं तर फर्स्ट क्लाससाठी कॅन्सलेशन चार्ज 240 रुपये, सेकंड एसीसाठी 200 रुपये, थर्ड एसी आणि चेअर एसीसाठी 180 रुपये, स्लीपर क्लाससाठी 120 रुपये. सेकंड क्लास सीटिंगसाठी 60 रुपये आहे.

2. चार्ट तयार करण्यासाठी 12 तास आधी तिकीट रद्द केलं तर 25 टक्के रक्कम किंवा वर दिलेल्या कॅन्सलेशन चार्जेसमध्ये जे जास्त असेल ते कट केलं जाईल. ट्रेन सुटण्याआधी 4 तास तिकीट रद्द केलं तर 50 टक्के कॅन्सलेशन चार्ज लागतो. त्यानंतर तिकीट रद्द केलं तर कुठलाच रिफंड मिळणार नाही. हा चार्ज कन्फर्म आॅनलाइन तिकिटांसाठी आहे.

माणुसकीचं दर्शन.. स्वत: नायब तहसीलदारांनी पाठीवर वाहून नेली अन्नधान्याची पोती

3. तुमच्याकडे वेटिंग आॅनलाइन तिकीट असेल तर ट्रेन सुटण्याआधी अर्धा तास तिकीट रद्द केलं तर 60 रुपये कापले जातील. तिकीट कन्फर्म नसताना रद्द केलं तर पूर्ण रिफंड मिळेल. कन्फर्म तिकिटावर कॅन्सलेशनचा चार्ज कापला जाईल.

4. चार्ट तयार झाल्यावर तिकीट रद्द झालं तर वेगळे नियम आहेत. ई तिकीट चार्ट तयार झाल्यावर कॅन्सल होत नाही. रिफंडसाठी प्रवाशांना आॅनलाइन TDR फाइल करावा लागेल. नाही तर रिफंड मिळणार नाही.

5. तुम्ही तात्काळ तिकीट घेतलंत आणि कॅन्सल केलंत तर रिफंड मिळत नाही. ट्रेन तीन तास उशिरा धावत असेल तर रिफंड मिळू शकतो.

SPECIAL REPORT: लोकांची मनं जिंकण्यासाठी मोदींच्या जेम्स बॉन्डचं 'मिशन काश्मीर'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2019 01:05 PM IST

ताज्या बातम्या