उन्हाळ्याच्या सुट्टीत काश्मीरला जायचंय? IRCTC नं आणलंय नवं पॅकेज

उन्हाळ्याच्या सुट्टीत काश्मीरला जायचंय? IRCTC नं आणलंय नवं पॅकेज

पृथ्वीवरचा स्वर्ग असलेल्या या काश्मीरची टूर रेल्वेनं आयोजित केलीय. यात 8 रात्री आणि 9 दिवसाची सफर आहे.

  • Share this:

मुंबई, 17 मे : तुम्हाला काश्मीरला जायचं असेल तर IRCTC नं नवं पॅकेज आणलंय. पृथ्वीवरचा स्वर्ग असलेल्या या काश्मीरची टूर रेल्वेनं आयोजित केलीय. यात 8 रात्री आणि 9 दिवसाची सफर आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी 16,590 रुपयांपासून सुरुवात आहे.

पाकिस्तानात हाहाकार; कोट्यवधी रुपये बुडाले

जम्मूवरून होणार सुरुवात

IRCTCप्रमाणे या पॅकेजची सुरुवात जम्मूमधून होईल. जम्मू, कटरा, श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम फिरायची संधी मिळेल. याची सुरुवात 1 जूनपासून होईल आणि 30 एप्रिल 2020पर्यंत रेल्वेनं काश्मीर टूरची पॅकेजेस ठेवलीयत.

अवैध सावकारीतून दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी तरुण कंत्राटदाराची निर्घृण हत्या

16,590 रुपये माणशी खर्च

या टुरमध्ये ट्रिपल आॅक्युपन्सी 16,590 रुपये तर डबल 19,930 रुपये प्रति व्यक्ती आहे. तर सिंगल आॅक्युपन्सी 21,720 प्रति व्यक्ती आहे. 5 ते 11 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी 7,310 रुपये बेड आणि बेड नको असेल तर 4,340 रुपये खर्च आहे.

आरोप-प्रत्यारोपात रंगलेला लोकसभा निवडणुकीचा 'कटु' प्रचार अखेर संपला

पॅकेजची खासीयत

प्रवाशांना डिनर आणि ब्रेकफास्टसहित 3 स्टार हाॅटेलमध्ये उतरवलं जाईल.

एसी कारमध्ये फिरता येईल,

ड्रायव्हर आणि गाइडची सर्विस

प्रवाशांना ट्रॅव्हल इन्शुरन्स मिळेल

टोल, पार्किंग आणि टॅक्सी पॅकेजचा  समावेश

पॅकेज रद्द करण्याचे नियम

प्रवास सुरू होण्याआधी 15 दिवस रद्द केलात तर प्रत्येक व्यक्तीला रद्द करण्याचे चार्जेस 100 रुपये

प्रवास सुरू होण्याआधी 8 ते 14 दिवस रद्द केलंत तर 25 % कॅन्सलेशन चार्जेस

प्रवास सुरू होण्याआधी 4 ते 7 दिवस आधी रद्द केलं तर 50% कॅन्सलेशन चार्जेस

प्रवास सुरू होण्याआधी 4 दिवस आधी तुम्ही रद्द केलं तर 100 टक्के कॅन्सलेशन चार्जेस पडतील

VIDEO: मे महिन्याच्या 21 तारखेपासून मुंबई शहर काळोखात जाणार?

First published: May 17, 2019, 7:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading