News18 Lokmat

पैसे न भरता काढू शकता रेल्वेचं तिकीट, IRCTC ची नवी योजना

आता पैसे नसले तरीही तुम्ही रेल्वे तिकीट बुक करू शकाल. यात तुम्हाला अर्थशास्त्र प्रायव्हेट लिमिटेडचा पायलट प्रोजेक्ट तुम्हाला मदत करेल.

News18 Lokmat | Updated On: Apr 19, 2019 02:01 PM IST

पैसे न भरता काढू शकता रेल्वेचं तिकीट, IRCTC ची नवी योजना

मुंबई, 19 एप्रिल : तुम्हाला ट्रेनचं तिकीट बुक करायचंय, पण तुमच्याकडे पैसे नाहीत? अजिबात काळजी करू नका. आता पैसे नसले तरीही तुम्ही रेल्वे तिकीट बुक करू शकाल. यात तुम्हाला अर्थशास्त्र प्रायव्हेट लिमिटेडचा पायलट प्रोजेक्ट तुम्हाला मदत करेल. IRCTCनं आणलेला ई पे लेटर हा प्रोजेक्ट आहे. तुम्ही आता तिकीट काढून 14 दिवसांनी पैसे भरू शकता. जाणून घेऊ त्याबद्दल-

काय आहे ePayLater ?

या स्कीमप्रमाणे कुठलाही ग्राहक IRCTC च्या वेबसाइटवर कुठलंही पेमेंट न करता आॅनलाइन तिकीट बुक करू शकता आणि त्याचं पेमेंट 14 दिवसानंतर करू शकता. या सेवेचा फायदा घेणाऱ्या ग्राहकांना पेमेंट करताना 3.5 टक्के चार्ज द्यावा लागेल. तुम्ही 14 दिवसांच्या आत पेमेंट करत असाल, तर तुम्हाला जास्त व्याज द्यावं लागणार नाही. तुम्ही वेळेवर पैसे भरलेत तर तुमची क्रेडिट लिमिटही वाढेल.

या सेवेचा फायदा तुम्ही तुमच्या  IRCTC अकाऊंटवरून घेऊ शकता.तुम्ही घेतलेल्या तिकिटाची किंमत तुमच्या क्रेडिटमध्ये असायला हवी आणि ठरलेल्या वेळेत पेमेंट व्हायला हवं. तुम्ही पेमेंट करायला उशीर केलात तर तुमचं क्रेडिट कमी होईल. यानंतर तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकणार नाही.


Loading...

पैसे दिल्याशिवाय असं करा बुकिंग

तुम्ही तुमच्या IRCTC अकाऊंटमध्ये लाॅग इन करा. किंवा अकाऊंट नसेल तर नवीन अकाऊंट तयार करा. नंतर ज्या जागेचं तिकीट बुक करायचं असेल तिथले डिटेल्स भरा. तुमच्या सोयीची ट्रेन निवडा आणि बुक नाऊवर क्लिक करा. त्यानंतर नवं पेज ओपन होईल. त्यात तुम्हाला प्रवाशांची डिटेल्स आणि कॅप्चा कोड भरावं लागेल.  हे भरल्यानंतर पुढच्या बटनावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर नवं पेज उघडेल. त्यात तुम्ही तुमच्या डेबिट, क्रेडिट, Bhim App चे डिटेल्स भरा. याबरोबर तुम्हाला ePayLaterचं आॅप्शन मिळेल. त्यावर तुम्ही क्लिक करा.

क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही सेवा घेण्यासाठी ePayLater वर रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला www.epaylater.in वर जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्या समोर बिल पेमेंटचं आॅप्शन येईल. त्याची निवड केली की ट्रेनचं तिकीट मिळेल.

पैसे भरले नाहीत तर अकाऊंट रद्द होऊ शकतं

तिकीट बुक झाल्यानंतर 14 दिवसांनंतरही तुम्ही पेमेंट केलं नाहीत, तर तिकिटाच्या किमतीवर व्याज घेतलं जाईल. त्याहून जास्त उशीर केलात तर तुमचं अकाऊंट रद्द होऊ शकतं.


VIDEO: जोतिबाच्या नावानं चांगभलं! यात्रेसाठी भक्तांची गर्दी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 19, 2019 02:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...