रेल्वे तिकीट बुक करणं झालं आणखी स्वस्त आणि सोपं; IRCTC ने सुरू केली 'ही' नवी सेवा

जाणून घ्या IRCTC च्या नव्या प्रणालीचे फायदे?

  • Share this:

प्रवाशांना उत्तम सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने  भारतीय रेल्वेने अनेक उपाययोजना केल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुटीत वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने 14 समर स्पेशल ट्रेन सुरू केल्या आहेत. त्याच बरोबरीने इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिजम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC ने एक नवी प्रणाली सुरू केली आहे.

त्यानुसार IRCTC च्या माध्यमातून तिकीट बुक करणं आणखी स्वस्त आणि सोपं झालं आहे. या प्रणालीमुळे प्रवाशी रेल्वे तिकीट आणखी वेगानं बुक करू शकतील. IRCTC ने स्वतःचं पेमेंट एग्रिगेटर सिस्टम (Payment Aggregator System) IRCTC iPay सुरू केलं आहे. त्यामुळे IRCTCच्या माध्यमातून तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना आता पेमेंट करताना थर्ड पार्टी प्लेटफॉर्मचा उपयोग करावा लागणार नाही.

IRCTC iPay मध्ये पेमेंट करण्यासाठी UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि इंटरनॅशनल कार्ड सारखे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. IRCTC या प्लेटफॉर्मवर प्रीपेड कार्ड वॉलेट सारखा पर्यासुद्धा उपलब्ध करणार आहे. त्यामुळे पेमेंट सिस्टिमवर  IRCTCचं पूर्ण नियंत्रण राहणार असल्याचं स्पष्ट होतं.

या सुविधेमुळे बँका आणि IRCTC मधला संबंध पूर्णतः संपणार असून त्यामुळे पेमेंट फेल होण्याची समस्या बऱ्यापैकी निकाली निघेल. जर कुणाचं ट्रांजेक्शन फेल झालंच तर तो प्रवासी थेट IRCTC शी संपर्क साधेल.

IRCTC च्या सुविधांचा लाभ घेणाऱ्यांसाठी हा बदल फायदेशीर ठरणार आहे. IRCTC iPay मुळे प्रवाशांना थर्ड पार्टी प्लेटफॉर्मवरून पेमेंट करण्याची गरज भासणार नाही. डेबिट कार्डद्वारे सुद्धा प्रवाशांना ई-टिकीट बुक करता येईल. त्यामुळे एक लाख रुपयांपर्यंतच्या ट्रांजेक्शनवर कोणतेच अतिरिक्त शुल्क प्रवाशांना भरावं लागणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2019 09:31 PM IST

ताज्या बातम्या