IRCTC चा सावधानतेचा इशारा, ट्रेनमध्ये जेवण मागवताना 'ही' चूक करू नका

ट्रेनमधून लांबच्या ठिकाणी प्रवास करताना जेवण मागवलं जातं. त्यावेळी घ्यायची ही काळजी-

News18 Lokmat | Updated On: May 17, 2019 02:15 PM IST

IRCTC चा सावधानतेचा इशारा, ट्रेनमध्ये जेवण मागवताना 'ही' चूक करू नका

मुंबई, 17 मे : तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत ट्रेनमधून कुठे जाण्याचा प्लॅन करत असाल तर महत्त्वाची बातमी. प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी भारतीय रेल्वेनं पूर्ण तयारी केलीय. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम काॅर्पोरेशन ( IRCTC )नं ट्रेननं प्रवास करणाऱ्यांना सावधानतेचा इशारा दिलाय. त्यांनी सांगितलंय की, जे मोबाइल अॅप्सवरून जेवण मागवतात, ते IRCTC चं नाही. IRCTC चं म्हणणं असं की, ट्रॅव्हल खाना आणि रेल यात्रीसारख्या अनधिकृत वेबसाइटवरून तुम्ही जेवण मागवलंत तर त्याच्या गुणवत्तेबाबत आयआरसीटीसी जबाबदार राहणार नाही.

काँग्रेसला किती जागा मिळणार? राहुल गांधी म्हणतात...


IRCTC चा सावधानतेचा इशारा

IRCTC नं ट्विट करून एक फोटो पोस्ट केलाय. ट्रॅव्हल खाना आणि रेल यात्री हे आयआरसीटीसी संबंधित नाही. प्रवाशांना आवाहन केलंय की त्यांनी फूड आॅन ट्रॅक मोबाइल अॅप किंवा www.ecatering.irctc.co.in इथून जेवण मागवावं.

Loading...

महात्मा गांधी हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता, भाजप प्रवक्ता बरळला

आॅनलाइन अ‍ॅप आणि बऱ्याच वेबसाइट्स रेल्वे प्रवासात जेवण पुरवतात. अनेकदा जेवणातल्या तक्रारी रेल्वेकडे केल्या जातात. पण त्याचा काही उपयोग नाही, असं रेल्वेनं सांगितलंय.

तणावग्रस्त व्यक्तींमुळे होतेय हाॅटेल इंडस्ट्रीची वाढ, कोण किती वेळा करतं हाॅटेलिंग?


IRCTC नं सांगितलंय की रेल यात्री, रेल रसोई, खाना गाडी, खाना ऑनलाइन, फूड इन ट्रेन, फूड ऑन व्हील,ट्रॅवल जायका, ट्रेन फूड, ट्रॅवल फूड आणि  ई-रेल यांचा भारतीय रेल्वेशी काही संबंध नाही.VIDEO: मराठा विद्यार्थ्यांना दिलासा, आरक्षणप्रकरणी सरकारचा मोठा निर्णय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: foodtrain
First Published: May 17, 2019 02:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...