लवकरच महागणार ट्रेनचा प्रवास, IRCTC लावणार हा दर

लवकरच महागणार ट्रेनचा प्रवास, IRCTC लावणार हा दर

IRCTC - रेल्वेचा प्रवास महाग होणार आहे. तिकीट बुक करण्याआधी हे वाचा

  • Share this:

मुंबई, 10 ऑगस्ट : तुम्ही ऑनलाइन रेल्वे तिकीट खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. आता तुमचा रेल्वे प्रवास थोडा महाग होऊ शकतो. भारतीय रेल्वे ई तिकीटावर (E Ticket) लागणारा सर्विस चार्ज पुन्हा वसूल करण्याच्या तयारीत आहे. हे एक सुविधा शुल्क आहे. लोकांना घरबसल्या ते द्यावं लागतं. नोटबंदीच्या आधी रेल्वे स्लीपर क्लासच्या तिकिटांवर 20 रुपये आणि एसी क्लासच्या तिकिटांवर 40 रुपये सुविधा दर होता. तो आता पुन्हा सुरू होऊ शकतो.

नोटबंदीच्या वेळी दिली होती सूट

नोव्हेंबर 2016मध्ये नोटबंदीच्या वेळी डिजिटल ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी ही सूट दिली होती. अर्थमंत्रालयाकडून रेल्वेला तशा सूचना दिल्या होत्या.IRCTC च्या ऑनलाइन बुकिंग सेवेचा लाभ रोज जवळजवळ 7 लाख लोक घेतात. आयआरसीटीसीची यामुळे वर्षाला 500 कोटी कमाई होते. ही कमाई बंद झाल्यानं रेल्वेला नुकसान झालं. नवी कामं सुरू करण्यावरही पैशाअभावी परिणाम व्हायला लागला.

सोन्याचे दर जाणार 40 हजाराच्या पुढे, पैसे कमवण्याची तुमच्याकडे उत्तम संधी

रेल्वे बोर्ड घेईल अंतिम निर्णय

सूत्रांच्या माहितीनुसार अर्थमंत्रालयानं सर्विस चार्ज काढून टाकणं तात्पुरतं असल्याचं सांगितलंय. त्यामुळे हे पैसे वसूल करण्यासंबंधी त्यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवलाय. आता यावर रेल्वे आणि IRCTC ची मीटिंग होईल. त्यानंतर निर्णय होऊन कधीपासून हा दर लागू करायचा हे ठरवलं जाईल.

माझ्या नवऱ्याची बायको : अखेर राधिका सौमित्रला लग्नासाठी देते होकार पण...

दरम्यान, 2017 मध्येच काश्मीरमध्ये  विस्टाडोम ट्रेन सुरू करण्याची घोषणा झाली होती. पण या ट्रेनची ट्रायल घेतल्यानंतर काही कारणांमुळे हे लाँचिंग मागे पडलं. गेलं वर्षभर ही विस्टाडोम कोचची एसी ट्रेन बडगाम स्टेशनवरच उभी आहे.

घर खरेदी करताय? मग म्युच्युअल फंडाची 'अशी' घ्या मदत आणि राहा टेंशन फ्री

काश्मीरमध्ये गेल्या दोन वर्षांत दगडफेक आणि हिंसक आंदोलनं सुरू होती. अशा स्थितीत पहाडी भागांतून प्रवास करताना दगडफेक झाली तर प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली होती. त्यामुळेच काचेच्या या ट्रेनचं लाँचिंग थांबवण्यात आलं होतं. पण आता काश्मीरमधली परिस्थिती नियंत्रणात असल्यामुळे ही ट्रेन सुरू करण्याला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.

नदीत पाणी नसल्याने लोकवस्तीत घुसणार होती मगर, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

Published by: Sonali Deshpande
First published: August 10, 2019, 3:46 PM IST
Tags: IRCTC

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading