मराठी बातम्या /बातम्या /मनी /सणासुदीच्या काळात IRCTC वर बुक करा तिकिट, फ्रीमध्ये मिळेल 50 लाखांची ही सुविधा; वाचा सविस्तर

सणासुदीच्या काळात IRCTC वर बुक करा तिकिट, फ्रीमध्ये मिळेल 50 लाखांची ही सुविधा; वाचा सविस्तर

आयआरसीटीसीवरून जर तुम्ही विमान प्रवासाचं बुकिंग केलं तर तुम्हाला सूट मिळणार आहे. आताच्या दिवाळीच्या (Diwali 2021) सीझनमध्ये जर तुम्ही आयआरसीटीसीवरून विमान प्रवासाचं तिकीट बुकिंग केलंत तर तुम्हाला कोणकोणते फायदे मिळतील याची माहिती IRCTC ने ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे

पुढे वाचा ...

  नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर: सध्या सणासुदीचा काळ (Festive season) सुरू आहे त्यामुळे सुट्टी घेऊन मूळ गावी, नातेवाईकांकडे किंवा दिवाळीनंतर फिरायला जाण्याचा विचार अनेक जण करत असतील. तुम्ही पण दिवाळी (Diwali 2021), भाऊबीज (Bhai Dooj 2021) आणि छठ पूजेच्या (Chhath Pooja 2021) सुट्टीदरम्यान फिरायला जाणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

  रेल्वे, विमानाच्या तिकीट बुकिंगसोबतच केटरिंग व हॉस्पिटॅलिटी सुविधा देणाऱ्या आयआरसीटीसीने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. आयआरसीटीसीवरून जर तुम्ही विमान प्रवासाचं बुकिंग केलं तर तुम्हाला सूट मिळणार आहे. आताच्या दिवाळीच्या (Diwali 2021) सीझनमध्ये जर तुम्ही आयआरसीटीसीवरून विमान प्रवासाचं तिकीट बुकिंग केलंत तर तुम्हाला कोणकोणते फायदे मिळतील याची माहिती IRCTC ने ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे. जाणून घेऊया याबद्दल सर्वकाही.

  हे वाचा-रेशन दुकानांत मिळणार LPG Gas Cylinder? वाचा काय आहे सरकारचा प्लॅन

  IRCTC ने काय केलं आहे ट्वीट?

  IRCTC नी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केलं आहे ज्यात त्यांनी म्हटलं आहे, ‘फेस्टिव्ह सीझनमध्ये काहीतरी खास घडावं असं सर्वांना वाटतं. #IRCTCAir च्या माध्यमातून तुम्ही सहज फ्लाइट तिकीट बुक करू शकता. त्यावर तुम्हाला कमीतकमी सुविधा शुल्क 50 रुपये द्यायला लागेल. 50 लाख रुपयांचा मोफत विमा मिळेल, LTC चं भाडं, विशेष डिफेन्स भाडं यासह अनेक फायदे तुम्हाला तिकीट बुक केल्यावर मिळतील.’

  जर तुमच्याकडे IRCTC SBI Premium Card असेल तर तुम्हाला विमान तिकीटाच्या बुकिंगवर 5 टक्के व्हॅल्यु बॅक सुविधा मिळेल. त्याशिवाय BookMyShow वर तुम्हाला 500 रुपयांचं मूव्ही व्हाउचर मिळेल. त्याचबरोबर 1500 बोनस रिवॉर्ड पॉइंट्सही मिळतील. irctc.co.in वर रेल्वे तिकीट बुकिंग वर पण विशेष सूट मिळणार आहे. तुम्ही www.irctc.co.in वर जाऊन रेल्वे आणि विमानाचं तिकीट बुकिंग करू शकता. त्यावर तुमचं 1.8% ट्रँझॅक्शन शुल्क वाचू शकतं.

  हे वाचा-दिवाळीआधी येणार महागाई भत्त्याचा एरिअर, जाणून घ्या किती येणार वाढीव पगार?

  सामान्य ग्राहकांच्या सेवेत IRCTC कायम कार्यरत असते. आपल्या प्रवाशांना उत्तम दर्जाचा प्रवास करता यावा त्यांना सर्वोत्कृष्ट हॉस्पिटॅलिटी सुविधा उपलब्ध करून द्याव्या यासाठी IRCTC कायम प्रयत्नशील असते. सरकारी कंपनी असली तरीही ती ग्राहकांना सर्वोच्च प्राधान्य देते.

  जर तुमच्या तिकीट बुकिंगसोबत मोफत विमा, व्हॅल्यु बॅक, मूव्ही व्हाउचर, ट्रान्झॅक्शन शुल्कात सूट इतक्या सुविधा मिळणार असतील तर तुम्ही नक्कीच त्याचा फायदा घ्याल. दिवाळीच्या धामधुमीत खूप खर्च होतो. त्यात अशा पद्धतीने कॅशबॅक आणि सूट मिळाली तर थोडीशी का होईना बचतच होईल.

  First published:

  Tags: IRCTC, Money