मुंबई, 16 मे : तुम्ही सुट्टीत ट्रेननं प्रवास करायचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी भारतीय रेल्वेनं अनेक सेवा सुरू केल्या. या सेवांमध्येच एक डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म सेवा आहे. या सेवेची खासीयत अशी की रेल्वे प्रवाशांना त्यांचं इच्छित स्थळ आलं की SMS अलर्ट पाठवून जागं करतं. म्हणजे प्रवाशांना झोप लागून उतरायचं ठिकाण पुढे गेलं असं होणार नाही.
घर विकून सुरू केला होता 'हा' व्यवसाय, आता कमवतायत महिन्याला 1 कोटी रुपये
याप्रमाणे अर्धा तास आधी फोन करून प्रवाशाला सांगितलं जाईल. IVR ला या सुविधेशी जोडत अलार्म सेवा सुरू केलीय. कस्टमर केअरच्या प्रतिनिधीकडून 139 नंबरवर प्रवासी अलर्टची सेवा मिळू शकेल.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत शरद पवारांनी केल्या 'या' 10 मागण्या
डेस्टिनेशन अलर्ट अॅक्टिवेट करण्यासाठी प्रवाशांना आपल्या मोबाइलवर 139 नंबरवर काॅल किंवा SMS करायला हवा. काॅल स्वीकारल्यावर पहिल्यांदा भाषेची निवड करा. त्यानंतर डेस्टिनेशन अलर्टसाठी पहिल्यांदा 7 नंबर आणि नंतर 2 नंबर प्रेस करा. नंतर 10 आकड्यांचा PNR नंबर एंटर करून तो डायल केल्यानंतर कन्फर्म करण्यासाठी 1 डायल करा. सिस्टम PNR नंबर तपासून डेस्टिनेशन स्टेशनसाठी अलर्ट फीड करेल.
मिठामुळे गुन्हा उघड! प्रेयसीच्या मदतीनं पत्नीची हत्या करून पुरलं प्रेयसीच्याच घरात
यानंतर कन्फर्मेशनचा SMS मिळेल. इच्छित स्थळ आल्यानंतर पहिल्यांदा मोबाइलवर काॅल येईल. प्रत्येक अलर्ट SMSला 3 रुपये पडतील. अशा प्रकारे फोनसाठीही पैसे द्यावे लागतील.
पुलवामातील 3 दहशतवाद्यांच्या एन्काउंटरनंतरचा LIVE VIDEO