Home /News /money /

कंटाळवाण्या नोकरीला करा Bye-Bye, बना रेल्वेचे ट्रॅव्हल सर्व्हिस एजंट आणि कमवा 80 हजारांपर्यंतची रक्कम

कंटाळवाण्या नोकरीला करा Bye-Bye, बना रेल्वेचे ट्रॅव्हल सर्व्हिस एजंट आणि कमवा 80 हजारांपर्यंतची रक्कम

तुम्हीही जर नवा व्यवसाय करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे.

नवी दिल्ली, 08 सप्टेंबर: सध्या कोरोना (Covid-19) महामारीमुळे सगळेच त्रस्त आहेत. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. त्यांना नवी नोकरी मिळणंही तसं अवघड आहे. पण ते व्यवसाय करू शकतात. तुम्हीही जर नवा व्यवसाय करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (Indian Railway Catering and Tourism Corporation IRCTC) तुमच्यासाठी एक उत्कृष्ट संधी उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही IRCTC चे एजंट (IRCTC Agent) म्हणून व्यवसाय सुरू करू शकता. भारतीय रेल्वेची तिकीट विक्री करण्यासाठी त्यांना एजंट नियुक्त करायचे असतात म्हणजे तुम्ही रेल्वेचे ट्रॅव्हल सर्व्हिस एजंट (Railway Travel Service Agent) म्हणून काम कराल आणि चांगले पैसे कमवू शकाल. चला तर मग जाणून घेऊया Railway Travel Service Agent कसं व्हायचं आणि तुम्हाला पैसे कसे मिळतील ते. असे मिळतील पैसे RSTA ही योजना मूळात 1985 मध्ये सुरू झाली. यात रेल्वेचं तिकिट बूक केल्याबद्दल एजंटला कमीशन मिळतं. जेव्हा एजंट आयआरसीटीसीच्या यंत्रणेत लॉग इन करेल तेव्हा आयआरसीटीसी ॲप्लिकेशन (IRCTC Application) डिजिटल प्रमाणपत्र तपासेल आणि ते तपासून तुम्हाला योग्य ठरवलं गेलं तर त्या लॉग इनच्या मार्फत ई-तिकिटं बूक करायला ती यंत्रणा तुम्हाला परवानगी देईल. तुम्ही बुक केलेल्या प्रत्येक तिकिटावर तुम्हाला IRCTC कडून कमीशन मिळेल. तुम्ही गैरएसी तिकिटं बुक केली तर एका PNR मागे तुम्हाला 20 रुपये तर एसी क्लासची तिकिटं असतील तर एका PNR मागे तुम्हाला 40 रुपये कमीशन मिळेल. त्याशिवाय 2000 रुपयांपेक्षा अधिक रकमेचा व्यवहार केल्यास एजंटला 1 टक्का कमीशन अधिक मिळतं. अशा पद्धतीने तुम्ही चांगली कमाई करू शकता.

Good News! पगारवाढीसाठी राहा तयार, या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळणार जबरदस्त Salary Hike

80,000 रुपयांपर्यंत होईल कमाई एका एजंटनी एका महिन्यात किती तिकिटं बूक (Ticket Booking) करावी याला मर्यादा नाही. एजंटला प्रत्येक बुकिंग आणि आर्थिक व्यवहारावर कमीशन मिळणार आहेच. जर तुम्ही मोठ्या संख्येने तिकिटं बूक करू शकलात तर दर महिन्याला तुम्हाला 80 हजार रुपयांपर्यंत कमाई करता येईल. जरी अगदी तुम्ही कमी तिकिटं बूक केलीत तरीही महिन्याला 40 ते 50 हजार रुपये कुठं जात नाहीत.

Indian Railway: 'लेट लतिफ' ट्रेनला बसला 30000 रुपयांचा दंड! सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

एजंट असं होता येईल IRCTC एजंट होण्यासाठी तुम्ही 12 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेलं असणं गरजेचं आहे. सर्वांत पहिल्यांदा IRCTC च्या वेबसाइटवर जाऊन सगळी माहिती जाणून घ्या. त्यानंतर एजंट होण्यासाठीचा अर्ज भरा. त्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, मोबाइल नंबर, सुरू असलेला ई-मेल आयडी, फोटो, Residential address proof, Declaration form ही कागदपत्रं सोबत ठेवावी लागतील. त्यांच्यासह तुम्ही हा अर्ज भरून सबमिट (Submit) केलात की पुढची प्रक्रिया सुरू होईल. बुकिंग एजन्सींसाठी दोन प्लॅन आहेत पहिल्या प्लॅनमध्ये एका वर्षाच्या एजन्सीसाठी तुम्हाला 3 हजार 999 रुपये भरावे लागतील. दुसऱ्या प्लॅनअंतर्गत तुम्हाला 6 हजार 999 रुपये भरावे लागतील. ही रक्कम भरण्यासाठी तुम्हाला डिमांड ड्राफ्ट (DD Demand Draft) काढावा लागेल.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: IRCTC, Job, Money

पुढील बातम्या