मराठी बातम्या /बातम्या /मनी /New IPO : येत्या 8 डिसेंबरला Shriram Properties चा आयपीओ येणार; 600 कोटी उभारणार

New IPO : येत्या 8 डिसेंबरला Shriram Properties चा आयपीओ येणार; 600 कोटी उभारणार

श्रीराम प्रॉपर्टीजच्या (Shriram Properties) या IPO मध्ये 250 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स जारी केले जातील. त्याच वेळी, यामध्ये ऑफर फॉल सेलसाठी (Offer  For Sell) 350 कोटी रुपयांची ऑफर देखील समाविष्ट आहे.

मुंबई, 4 डिसेंबर : बंगळुरूमधील रिअल इस्टेट कंपनी (Real Estate Company) श्रीराम प्रॉपर्टीजचा (Shriram Properties) IPO पुढील आठवड्यात 8 डिसेंबर 2021 रोजी सुरू होईल. हा IPO 600 कोटी रुपयांचा असेल. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार, हा IPO 10 डिसेंबर रोजी बंद होईल.

श्रीराम प्रॉपर्टीजच्या या IPO मध्ये 250 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स जारी केले जातील. त्याच वेळी, यामध्ये ऑफर फॉल सेलसाठी (Offer  For Sell) 350 कोटी रुपयांची ऑफर देखील समाविष्ट आहे. OFS अंतर्गत, कंपनीचे प्रमोटर्स आणि गुंतवणूकदार त्यांचे शेअर्स ऑफर फॉर सेलसाठी आणतील.

ऑफर फॉर सेल अंतर्गत, कंपनीच्या गुंतवणूकदारामध्ये ओमेगा टीसी सेबर होल्डिंग्ज 90.95 कोटी रुपयांचे आणि टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस 8.34 कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्स विकतील. याशिवाय, TPG Asia SF V Pte Ltd आणि WSI/WSQI V (XXXII) मॉरिशस देखील अनुक्रमे 92.21 कोटी आणि 133.5 कोटी रुपये किमतीचे शेअर्स विकतील. तसेच इतर काही शेअरहोल्डर्स देखील सुमारे 25 कोटी रुपयांचे शेअर्स विक्रीसाठी ठेवतील.

PF खातेधारकांना मिळणार 1 लाखांचा फायदा, कसे काढू शकता पैसे? चेक करा

IPO मधून उभी केलेली जास्तीत जास्त रक्कम कंपनी कर्ज कमी करण्यासाठी आणि इतर कॉर्पोरेट संबंधित कार्ये पूर्ण करण्यासाठी वापरली जाईल. बंगळुरू येथे मुख्यालय असलेले, श्रीराम प्रॉपर्टीज हे प्रामुख्याने दक्षिण भारतातील निवासी रिअल इस्टेट मार्केटवर केंद्रित आहे. आर्थिक वर्ष 2020 मध्ये कंपनीचा महसूल 571.96 कोटी रुपये होता. त्याआधीच्या वर्षी ते 650.13 कोटी रुपये होते.

Edelweiss Securities कडून गुंतवणुकीसाठी 'या' फर्मा स्टॉकची शिफारस, किती नफा होऊ शकतो?

मंजुरीनंतरही कंपनीने 2019 मध्ये IPO सादर केला नाही

श्रीराम प्रॉपर्टीजला देशातील बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच SEBI कडून 1250 कोटी रुपयांच्या IPO साठी 2019 साली मान्यता मिळाली, परंतु कंपनीने तेव्हा IPO लाँच केला नाही. आता कंपनी दुसऱ्या प्रयत्नात आपला IPO लॉन्च करणार आहे.

First published:
top videos

    Tags: Investment, Money, Share market