Home /News /money /

IPO मध्ये पैसे गुंतवून घरबसल्या कमवा मोठा नफा, काय आहे स्कीम

IPO मध्ये पैसे गुंतवून घरबसल्या कमवा मोठा नफा, काय आहे स्कीम

भरघोस कमाईची संधी देणारा एक आयपीओ सोमवारपासून खुला झाला असून, आतापर्यंत हुकलेली संधी साधण्यासाठी हा चांगला पर्याय आहे.

    नवी दिल्ली, 22 डिसेंबर: सध्या शेअर बाजारात गुंतवणूक करणारे लोक आयपीओमध्ये (IPO)गुंतवणूक करून भरपूर नफा कमवत आहेत. अशीच भरघोस कमाईची संधी देणारा एक आयपीओ सोमवारपासून खुला झाला असून, आतापर्यंत हुकलेली संधी साधण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. हा आयपीओ आहे अँटनी वेस्ट हँडलिंग सेलचा (Antony Waste Handling Cell). या आयपीओत गुंतवणूक करून तुम्ही चांगला फायदा मिळवू शकता. कंपनीनं या आयपीओद्वारे 300 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे. 21ते 23 डिसेंबर दरम्यान या आयपीओमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. कंपनीनं आपल्या शेअर्सची किंमत 313 -315 रुपयांच्या पट्ट्यात ठेवली असून, या आयपीओत कंपनी 85 कोटी रुपयांचे शेअर्स विक्रीसाठी खुले करणार आहे. त्याशिवाय कंपनीचे प्रवर्तक (Promotors)आणि खासगी शेअरधारक यांचे 68 लाख 24 हजार 933 शेअर्सही विक्रीसाठी खुले करण्यात येणार आहेत. या आयपीओतील 50 टक्के शेअर्स इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी (Institutional Investors)राखीव ठेवण्यात आले असून, 35 टक्के शेअर्स रिटेल आणि 15 टक्के शेअर्स नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. आयपीओ आणण्यामागचा उद्देश- या आयपीओमधून (IPO) उभ्या राहणाऱ्या निधीतून 40कोटी रुपये कंपनी पीसीएमसी डब्ल्यूटीई प्रोजेक्टसाठी (PCMC WTE Project) खर्च करणार आहे.त्याशिवाय 38.5 कोटी रुपये कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे. कंपनीविषयी महत्त्वाची माहिती - -अँटनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेड ही घनकचरा व्यवस्थापन (Solid Waste Management) क्षेत्रातली आघाडीच्या 5 कंपन्यांपैकी एक आहे. - कंपनीकडे गेल्या 20 वर्षापासून 25 प्रकल्प असून, त्यापैकी 18 प्रकल्पांवर अद्याप काम सुरू आहे. - कंपनी घनकचरा व्यवस्थापनासाठी सर्व सेवा पुरवते. यामध्ये कचरा गोळा करण्यापासून ते त्याची वाहतूक, त्यावरील प्रक्रिया आणि कचऱ्यातून उर्जा निर्मितीचाही समावेश आहे. हे वाचा-Post Officeच्या या स्किममध्ये गुंतवणूक केल्यास,दुप्पट मिळतील पैसे; काय आहे योजना - ही कंपनी महाराष्ट्रातील कांजुरमार्ग कचरा प्रकल्पाचे व्यवस्थापन करते. हा प्रकल्प आशियातील एका ठिकाणी असणाऱ्या सर्वांत मोठ्या कचरा प्रक्रिया प्रकल्पापैकी (Waste Processing Unit) एक आहे. - कंपनीनं वर्ष 2018 ते 2020 दरम्यान, 27.73 टक्के महसूल (Revenue) मिळवला आहे. तिचा ईबीटा (EBITDA CAGR) सीएजीआरच्या 28.65 टक्के आहे. कंपनीनं या आयपीओच्या (IPO)व्यवस्थापनाची जबाबदारी इक्विरस कॅपिटल (Equirus Capital)आणि आयआयएफएल सिक्युरिटीज (IIFL Securities)यांच्याकडं दिली आहे. कंपनीचे शेअर्स मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजारातही (NSE) नोंदवले जाणार आहेत.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Money, Mumbai

    पुढील बातम्या