LPG Gas Cylinder Rules: पुढील 4 दिवसात बदलणार LPG घरगुती गॅस सिलेंडरबाबतचा हा नियम, वाचा सविस्तर

LPG Gas Cylinder Rules: पुढील 4 दिवसात बदलणार LPG घरगुती गॅस सिलेंडरबाबतचा हा नियम, वाचा सविस्तर

एलपीजी गॅस सिलेंडरच्या घरपोच सेवेच्या (LPG Cylinder Home Delivery) प्रक्रियेमध्ये पुढील महिन्यापासून महत्त्वाचे बदल होणार आहेत. इथे वाचा नेमके काय बदल होणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : एलपीजी घरगुती गॅसची होम डिलिव्हरी (LPG Cylinder Home Delivery) जर तुम्ही घेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. यांसदर्भातील काही नियमात येत्या 4 दिवसात काही बदल होणार आहेत. या संपूर्ण प्रणालीमध्ये बदल होणार आहे. 1 नोव्हेंबरपासून घरगुती सिलेंडर्सची चोरी रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहकाची ओळख होण्यासाठी तेल कंपन्यांकडून नवीन एलपीजी सिलेंडरची सिस्टम लागू केली जाणार आहे. काय आहे ही नवीन प्रणाली आणि कशी होणार तुमच्या घरापर्यंत डिलिव्हरी, याबाबत इथे वाचा सविस्तर.

तुम्हाला आता सिलेंडरची डिलिव्हरी घेताना तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी द्यावा लागणार आहे. या नवीन प्रणालीला DAC असे नाव देण्यात आले आहे, म्हणजेच डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (Delivery Authentication Code). आता केवळ सिलेंडर बुक केल्यानंतर तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळणार नाही, तर तुमच्या रजिस्टर्ड फोन क्रमांकावर एक कोड पाठवला जाईल. डिलिव्हरी बॉय तुमच्या सिलेंडरची डिलिव्हरी घेऊन आल्यावर तुम्हाला त्याला हा कोड सांगावा लागेल. त्यानंतरच तुम्हाला तुमच्या एलपीजी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी दिली जाईल.

(हे वाचा-घरबसल्या असं बनवा मतदान ओळखपत्र, ही कागदपत्र असणं आवश्यक)

तेल कंपन्या हा प्रयोग सुरुवातीला 100 स्मार्ट सिटीजमध्ये लागू करणार आहे. त्यानंतर हळूहळू इतर शहरांमध्ये ही प्रणाली लागू केली जाईल. जयपूरमध्ये या प्रणालीचा पायलट प्रोजेक्ट आधीपासूनच सुरू आहे. या प्रयोगात तेल कंपन्या 95 टक्के यशस्वी झाल्या आहेत. ही प्रणाली केवळ घरगुती सिलेंडर्सवर लागू करण्यात येणार आहे, कमर्शिअल सिलेंडर्सवर नाही.

जर एखाद्या ग्राहकाने त्याचा मोबाइल नंबर डिस्ट्रिब्युटरकडे अपडेट केला नसेल, तर डिलिव्हरी बॉयकडे याबाबतचे एक App असेल. ज्या माध्यमातून तुम्ही त्या क्षणीच तुमचा मोबाइल क्रमांक अपडेट करू शकता आणि ज्यानंतर कोड मिळेल. ज्या ग्राहकांचा पत्ता किंवा मोबाइल क्रमांक चुकीचा आहे, अशांना समस्या निर्माण होऊ शकते. या कारणांमुळे त्यांच्या एलपीजी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी थांबवली जाऊ शकते.

(हे वाचा-Google सर्चमध्ये PF ऑफिसचा दिलेला हा नंबर डायल करताय तर सावधान! होऊ शकते फसवणूक)

परिणामी तेल कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांना असा सल्ला दिला आहे की, त्यांनी याकरता आवश्यक त्यांचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांत त्वरित अपडेट करून घ्यावे. जेणेकरून त्यांना सिलेंडरच्या डिलिव्हीरवेळी कोणत्याही समस्येला तोंड द्यावे लागणार नाही.

-

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 27, 2020, 8:35 AM IST
Tags: gasmoney

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading