• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Mutual Funds देतायंत मालामाल होण्याची संधी, सलग दोन महिन्यात झाली मोठी गुंतवणूक

Mutual Funds देतायंत मालामाल होण्याची संधी, सलग दोन महिन्यात झाली मोठी गुंतवणूक

म्युच्युअल फंड (Mutual Fund) कंपन्यांनी एप्रिल महिन्यात शेअर्समध्ये 5,526 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हा सलग दुसरा महिना आहे जेव्हा त्यांनी बाजारात काही सुधारणा पाहिल्यानंतर शेअर्समध्ये गुंतवणूक केली गेली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 09 मे: म्युच्युअल फंड (Mutual Fund) कंपन्यांनी एप्रिल महिन्यात शेअर्समध्ये 5,526 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हा सलग दुसरा महिना आहे जेव्हा त्यांनी बाजारात काही सुधारणा पाहिल्यानंतर शेअर्समध्ये गुंतवणूक केली गेली आहे. इनव्हेस्ट 19 चे संस्थापक आणि सीईओ कौशलेन्द्र सिंह सेंगर यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक आर्थिक औद्योगिक कंपन्या या क्षेत्रात पाऊल टाकत आहेत. त्यामुळे म्युच्यूअल फंड वापरणाऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, परिणामी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक देखील वाढेल. बजाज कॅपिटलचे मुख्य शोध अधिकारी आलोक अग्रवाल यांच्यामते देखील म्युच्यूअल फंडातील तेजी काही काळ कायम राहील, कारण 2020021 च्या आर्थिक वर्षाच्या आर्थिक निकालानंतर मूल्यांकन खाली आले आहे आणि किंमती सुधारल्यामुळे गुंतवणूकदारांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची संधी मिळत आहे. अधिक रिटर्न मिळवण्यासाठी शेअरमध्ये गुंतवणूक गुंतवणूकदार अधिक रिटर्न मिळवण्यासाठी शेअर्समध्ये गुंतवणूक करत आहेत. SEBI च्या आकड्यांच्या मते म्युच्यूअल फंड कंपन्यांनी एप्रिल महिन्यात शुद्ध रुपात शेअर्समध्ये 5,526 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मार्चमध्ये हा आकडा  4,773 कोटी रुपये होता. हे वाचा-पुढे 8 दिवस बंद राहणार बँका, कोरोना काळात खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा यादी म्युच्यूअल फंडद्वारे गेल्या दहा महिन्यात झालेली ही मोठी गुंतवणूक आहे. सेबीच्या आकडेवारीनुसार या गुंतवणुकीआधी म्युच्यूअल फंड कंपन्या जून 2020 पासून शेअर बाजारातून पैसे काढत होते. सेंगर यांनी अशी माहिती दिली की, गेल्या महिन्यात आपण म्युच्यूअल फंड्सच्या शेअर्समध्ये झालेल्या गुंतवणुकीत 15.8 टक्के वाढ झाली. शेअर बाजारातील चढउतार पाहता गुंतवणुकदारांनी जोखीम कमी करण्यासाठी इक्विटी म्युच्यूअल फंड्सचा आधार घेतला आहे. हे वाचा-महत्त्वाची बातमी! LIC मध्ये होतोय मोठा बदल, उद्यापासून लागू होणार नियम आलोक अग्रवाल यांच्या माहितीनुसार, मार्चमध्ये SIP मधील गुंतवणूक वाढून 9,182 कोटी झाली आहे. जी आधीच्या महिन्यात 7,528 कोटी होती. त्यामुळे म्युच्यूअल फंड कंपन्यांकडून शेअर बाजारात मार्च महिन्यात सर्वाधिक गुंतवणूक पाहायला मिळाली. त्यांच्या माहितीनुसार एप्रिलची आकडेवारी अद्याप समोर आली नसली तरी इक्विटी म्यूच्युअल फंड योजनांमध्ये प्रवाह अजूनही सुरू आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडात इक्विटीमध्ये गुंतवणूक वाढली असल्याचं स्पष्ट आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: