Home /News /money /

Investment Tips : शेअर बाजारातील घसरणीत नुकसान टाळायचंय? असा तयार करा पोर्टफोलियो नुकसान टळेल

Investment Tips : शेअर बाजारातील घसरणीत नुकसान टाळायचंय? असा तयार करा पोर्टफोलियो नुकसान टळेल

तुम्ही नवीन गुंतवणूकदार असाल आणि तुम्हाला बाजाराचे जास्त ज्ञान नसेल, तर इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी म्युच्युअल फंडाचा पर्याय निवडणे चांगले. यामुळे तुम्हाला मार्केटबद्दलची तुमची समज वाढवण्यासाठी वेळ मिळेल.

    मुंबई, 25 जानेवारी : शेअर बाजाराने (Share Market) 2021 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना बंपर नफा दिला, परंतु 2022 मध्ये शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या घसरणीत सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास 5 टक्क्यांनी खाली आले आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी काही खास टिप्स (Investment tips) फॉलो करुन त्यांचा पोर्टफोलिओ (Investment Portfolio) बनवला तर ते बाजाराच्या या घसरणीपासून स्वत:ला वाचवू शकतात आणि पैशांचं नुकसान होणार नाही. एकरकमी गुंतवणूक करू नका गेल्या आठवडाभरात बाजार 5 टक्क्यांनी खाली आला आहे. अशा स्थितीत जर तुम्ही 1000 रुपयांचा स्टॉक घेतला असता तर तुमचे एकूण नुकसान फक्त 50 रुपये झाले असते, तर ज्यांनी जास्त फायद्याच्या लालसेने 10 लाखांची गुंतवणूक केली त्यांना 50 हजारांचे नुकसान झाले असते. यावरून हे स्पष्ट होते की पोर्टफोलिओमधील संपूर्ण रक्कम एकाच ठिकाणी गुंतवू नये. शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक; सेन्सेक्समध्ये 366 अंकांची तर निफ्टीत 128 अंकांची उसळी नवीन गुंतवणूकदारांनी काय करावं? जर तुम्ही नवीन गुंतवणूकदार असाल आणि तुम्हाला बाजाराचे जास्त ज्ञान नसेल, तर इक्विटीमध्ये गुंतवणूक (Equity Investment) करण्याऐवजी म्युच्युअल फंडाचा पर्याय निवडणे चांगले. यामुळे तुम्हाला मार्केटबद्दलची तुमची समज वाढवण्यासाठी वेळ मिळेल. यासाठी तुम्ही इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. फंड मॅनेजमेंटचे काम तुम्ही अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांच्या (AMCs) तज्ज्ञांवर सोपवले तर बरे होईल. SIP करणे अधिक सुरक्षित इक्विटी म्युच्युअल फंडातही एकरकमी पैसे गुंतवण्याऐवजी, सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे दरमहा थोडीशी रक्कम गुंतवावी. याद्वारे तुम्ही कोणतीही जोखीम न घेता उच्च परतावा मिळवू शकता. बाजारातील घसरण किंवा वाढीचा अशा SIP वर अचानक परिणाम होत नाही, जे पोर्टफोलिओ स्थिर ठेवतात. Google मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी! पुण्यात उघडणार ऑफिस, जाणून घ्या तुम्हाला काय करायचं? तुम्ही सोन्या-चांदीमध्येही पैसे गुंतवू शकता शेअर बाजारातील धोका टाळण्यासाठी बहुतांश गुंतवणूकदार सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक (Gold-Silver Investment) करतात. जगभरातील बाजारपेठेवरील वाढता धोका पाहता सोन्याच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. उद्योगांमध्येही चांदीचा वापर वाढत आहे, त्यामुळे येत्या तीन वर्षांत ते अडीचपट परतावा देऊ शकते.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Mutual Funds, Share market

    पुढील बातम्या