घरबसल्या कमवा 5 हजार रुपये! काय आहे मोदी सरकारची योजना जाणून घ्या

घरबसल्या कमवा 5 हजार रुपये! काय आहे मोदी सरकारची योजना जाणून घ्या

मोदी सरकारच्या या योजनेचा लाभ जर तुम्ही घेतला तर घरबसल्या महिना 5 तर वर्षाला 60 हजार रुपये मिळवू शकतात.

  • Share this:

मुंबई, 21 डिसेंबर: तुम्ही आतापर्यंत तुमच्या भविष्यासाठीच्या पैशांची तरतूद केली नसेल तर चिंता करू नका. तुमच्यासाठी मोदी सरकरकडून विशेष योजना देण्यात आली आहे. त्यामुळे सरकारनं दिलेल्या या खास योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला अशा एका योजनेची माहिती देणार आहोत जी तुम्हाला वयाच्य़ा 60 वर्षांपर्यंत 5 हजार रुपये महिना असा विचार केला तर 60 हजार रुपये वर्षाला तुम्हाला फायदा मिळू शकतो.

अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana): ज्यांना कमी पगार आहे किंवा जे सध्या कमवत नाहीत अशा तरुणांसाठी एक प्रसिद्ध पेन्शन योजना वयाच्या 18 व्या वर्षापासून तुम्ही सुरू करू शकता. बँकेमध्ये तुम्हाला खातं उघडणं आवश्यक आहे. ज्यामध्ये तुम्ही दर महिना किंवा तीन अथवा सहा महिन्यांनी पैसे भरण्याची सुविधा आहे. यामध्ये जास्तीत जास्त 60 हजार रुपये म्हणजेच महिन्याला 5 हजार रुपये तुम्हाला मिळण्याची गॅरेंटी या योजनेद्वारे दिली जाते.

वाचा-कमाल! अवघ्या 8 वर्षांच्या मुलाने कमवले 182 कोटी रुपये! जगात ठरला अव्वल

कसे मिळणार 5 हजार रुपये महिना पैसे

तुम्ही जर अटल पेन्शन योजना वयाच्या 18 व्या वर्षापासून सुरू केली तर 5 हजार रुपये याप्रमाणे 60 हजार रुपये वर्षाचे असं तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होतात. जर तुम्ही 210 रुपये महिन्याला खात्यात जमा केले तर 210 प्रमाणे वर्षाला 2520 रुपये खात्यात होतील. तुम्हाला 210 रुपये प्रति महिना पेन्शन योजनेसाठी बँकेच्या खात्यात भरावे लागणार आहेत. एकही महिना न चुकवता वयाच्या 60व्या वर्षापर्यंत तुम्ही हे पैसे भरत राहिलात तर तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षानंतर 5 हजार रुपये दर महिना पैसे पेन्शन म्हणून मिळणार आहेत. थोडक्यात वर्षाला 60 हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत. ही योजना तुम्ही मध्ये थांबवलीत अथवा बंद केली तर यासंदर्भातील अधिक तपशील तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेतून मिळू शकतात. मात्र एकदा तुम्ही ही रक्कम भरायला सुरुवात केली तर ती वयाच्या 60व्या वर्षांपर्यंत तुम्हाला भरत रहावी लागणार आहे.

ही योजना चांगली असली तरीही या योजनेसंदर्भातील अधिक तपशील हे तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन तपासावे. यामध्ये वेगवेगळ्या वयोगटासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. ही योजना तुम्ही घरातील इतर सदस्यांच्या नावेही सुरू करू शकता. ज्याचा फायदा घरातील सदस्याला होऊ शकतो.

वाचा-आता कार्ड किंवा पैसे न देता करा शॉपिंग, SBI ची ही खास सेवा

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 21, 2019, 1:45 PM IST

ताज्या बातम्या