मराठी बातम्या /बातम्या /मनी /Investment Tips: 'या' 5 टिप्स फॉलो करा अन् बना Smart Investor, उद्भवणार नाही आर्थिक संकट

Investment Tips: 'या' 5 टिप्स फॉलो करा अन् बना Smart Investor, उद्भवणार नाही आर्थिक संकट

Investment Tips : अभ्यास आणि सरावाने स्मार्ट गुंतवणूक करून स्मार्ट इन्व्हेस्टर होता येतं. त्यासाठी टिप्सचा वापर करणं गरजेचं आहे.

Investment Tips : अभ्यास आणि सरावाने स्मार्ट गुंतवणूक करून स्मार्ट इन्व्हेस्टर होता येतं. त्यासाठी टिप्सचा वापर करणं गरजेचं आहे.

Investment Tips : अभ्यास आणि सरावाने स्मार्ट गुंतवणूक करून स्मार्ट इन्व्हेस्टर होता येतं. त्यासाठी टिप्सचा वापर करणं गरजेचं आहे.

    नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : दैनंदिन गरजेच्या वस्तू मागवण्यापासून ते स्मार्ट टीव्ही खरेदी करण्यापर्यंत आपण आता डिजिटल तंत्रज्ञान वापरतो. केवळ एका क्लिकवर सगळ्या सुविधा उपलब्ध असतात. आपली घरं, टीव्ही सगळंच स्मार्ट झालं आहे. या सगळ्याबरोबरच आपण कमवलेले पैसे स्मार्टपणे गुंतवणंही गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला एक स्मार्ट इन्व्हेस्टर म्हणजे स्मार्ट गुंतवणूकदार (Very Smart Investor) व्हायला हवं. ते कसं होता येईल याच्यासाठी एंजल ब्रोकिंगचे चीफ ग्रोथ ऑफिसर प्रभाकर तिवारी (Prabhakar Tiwari, Chief Growth Officer, Angel One Ltd ) यांनी न्यूज 18 च्या वाचकांसाठी काही विशेष टिप्स दिल्या आहेत. त्यांनी सांगितलेल्या टिप्स तुम्ही वापरल्या तर तुम्हाला चांगले रिटर्न तर मिळतीलच पण तुमची जोखीमही कमी होईल.

    स्मार्ट गुंतवणूकदार कोण असतो?

    ज्याला एका रात्रीत भरपूर पैसे कमवता येतात त्याला कधीही स्मार्ट गुंतवणूकदार म्हणत नाहीत हे लक्षात ठेवा. आपल्या उपलब्ध साधनांचा व्यवस्थित वापर करून घेऊन सातत्याने गुंतवणूक करून वेगवेगळ्या प्रकारांत गुंतवणूक करून आपला पोर्टफोलिओ तयार करतो तो खरा स्मार्ट गुंतवणूकदार. तो थोड्या-थोड्या वेळाने यातून पैसे कमवत राहतो. सगळे जिथं गुंतवणूक करत आहेत तिथे स्मार्ट इन्व्हेस्टर आपला पैसा लावत नाही तर तो प्रत्येकवेळी व्यवस्थित संशधन करून निर्णय घेतो आणि त्याला योग्य वाटतं तिथंच आपले पैसे गुंतवतो. आता जाणून घेऊया प्रभाकर तिवारी यांनी सांगितलेल्या टिप्स.

    वाचा : या कर्मचाऱ्यांना लवकरच मिळू शकते मोठी खूशखबर! वाचा काय सरकारचा प्लॅन

    स्टॉक ब्रोकिंग ॲप डाउनलोड करा

    सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या स्मार्टफोनमध्ये स्टॉक ब्रोकिंग ॲप डाउनलोड करा. तुम्ही नवे गुंतवणूकदार असाल तर कमीतकमी ब्रोकरेज घेणारं ॲप निवडा आणि तुमचं डी-मॅट खातं उघडा. ॲपमुळे तुम्हाला काम किंवा व्यवसाय करताकरता शेअर बाजारावर लक्ष ठेवता येतं आणि गुंतवणूक करता येते.

    कमी जोखीम आणि जास्त रिटर्न

    नियमांवरआधारित गुंतवणूक इंजिनसारख्या डिजिटल सुविधांचा वापर ॲपमधून करा. या इंजिनमध्ये मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे जी माहिती मिळते त्यावर अवलंबून गुंतवणुकीच्या शिफारशी ही इंजिन करतात त्यामुळे पूर्वग्रहदूषित सल्ला मिळत नाही. त्यामुळे जोखीम कमी होऊन रिटर्न जास्त मिळतात.

    वाचा : Paytm ची घसरण थांबली, शेअरमध्ये 9 टक्क्यांची उसळी; काय आहे आज शेअरची किंमत?

    थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म्‍स वापरा

    थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवर आंतरराष्ट्रीय बाजारांतील गुंतवणुकींची माहिती तसंच वेगवेगळे पोर्टफोलिओ वापरता येतात. त्याचा उपयोग करून तुम्ही कमी गुंतवणुकीत दीर्घकालीन पोर्टफोलिओ तयार करू शकता. इक्विटीत गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने सर्वोत्तम पर्यायांपैकी एक म्हणजे थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मचा वापर करणं, त्यामुळे ते अवश्य वापरा.

    स्टॉक ब्रोकिंग ॲपच्या अलर्टवर लक्ष ठेवा

    स्टॉक ब्रोकिंग ॲपचा वापर करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे त्यातून मिळणारे अलर्ट. कामाच्या गडबडीत शेअर बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवणं शक्य होत नाही त्यामुळे या अपच्या माध्यमातून येणाऱ्या अलर्टमुळे आपल्याला माहिती मिळते आणि आपण गुंतवणुकीचे निर्णय घेऊ शकतो त्यामुळे त्यांना प्रचंड महत्त्व आहे.

    वाचा : PMC ग्राहकांना 10 वर्षांत मिळणार पूर्ण पैसे, RBI ने केली मोठ्या निर्णयाची घोषणा

    डिजिटल ब्रोकर्सचा उपयोग

    डिजिटल ब्रोकर्सचा उपयोग गुंतवणुकीसाठी गाईड म्हणून वापर करावा. नवशिक्यापासून अनुभवी गुंतवणूकदारही या प्लॅटफॉर्मचा वापर करून गुंतवणुकीचा धडा घेऊ शकतात. या ब्रोकर्सच्या माध्यमातून शेअर बाजारातील गुंतवणुकीमधील बारकावे, पायाभूत गोष्टी आणि बिझनेस स्ट्रॅटर्जी शिकता येऊ शकतात. अशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने गुंतवणूक करून मोठी कमाई करू शकता आणि स्मार्ट गुंतवणूकदार होऊ शकता.

    First published:

    Tags: Investment, Money, Savings and investments, Share market