Home /News /money /

शेअर बाजारात गुंतवणुकीची जोखीम नको, मग गुंतवणुकीचे 'हे' पर्याय तुमच्यासाठी ठरतील फायदेशीर

शेअर बाजारात गुंतवणुकीची जोखीम नको, मग गुंतवणुकीचे 'हे' पर्याय तुमच्यासाठी ठरतील फायदेशीर

Investment Tips: तुम्ही तुमची गुंतवणूक तीन वेगवेगळ्या भागात विभागली पाहिजे. यामध्ये तात्काळ गरजांसाठी निधी निर्माण करण्यासोबतच दीर्घकालीन उच्च परताव्यावरही लक्ष ठेवण्याची गरज आहे.

    मुंबई, 10 मे : शेअर बाजारात (Share Market) पुन्हा एकदा मंदीचे वातावरण असून गुंतवणूकदारांची विक्री सुरू आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमची गुंतवणुकीची रणनीतीही बदलली पाहिजे आणि ही जोखीम (Investment Risk) टाळून चांगल्या परताव्याच्या आणि सुरक्षित गुंतवणुकीकडेही (Safe Investment) वळलं पाहिजे. पैसे गुंतवण्याबरोबरच त्यावरील परतावा मोजण्यासोबत गुंतवलेले पैसे कधी काढता येतील हेही लक्षात ठेवायला हवे. यासाठी तुम्ही तुमची गुंतवणूक तीन वेगवेगळ्या भागात विभागली पाहिजे. यामध्ये तात्काळ गरजांसाठी निधी निर्माण करण्यासोबतच दीर्घकालीन उच्च परताव्यावरही लक्ष ठेवण्याची गरज आहे. लिक्विड फंड पैशाची तात्काळ गरज भागवेल गुंतवणूक सल्लागार बळवंत जैन म्हणतात की आर्थिक संकट वाढण्याची शक्यता लक्षात घेता लिक्विड फंडात गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. म्युच्युअल फंडाच्या या विभागात, पैशांची तातडीची गरज असताना पैसे काढता येतात. बचत खाते 2 ते 3 टक्के व्याज देते, तर लिक्विड फंड तुम्हाला 6 टक्क्यांपर्यंत व्याज देते. या फंडाचा लॉकइन कालावधी 7 दिवसांचा आहे, त्यानंतर तुम्हाला 50 हजार रुपये एकरकमी काढण्याची सुविधा मिळते. Home Loan महागल्याने बजेट कोलमडलं? 'या' टिप्स फॉलो करुन तुम्ही EMI कमी करु शकता इक्विटी म्युच्युअल फंड दीर्घ मुदतीसाठी असतात जर तुमचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट 5 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल, तर म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय असेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही मुलांचे शिक्षण, लग्न किंवा निवृत्तीचे नियोजन करत असाल तर तुम्ही या पर्यायाचा लाभ घ्यावा. जरी सध्या इक्विटी मार्केटमध्ये घसरण होत असली तरी दीर्घकालीन विचार केल्यास दरवर्षी 12 ते 13 टक्के नफा मिळतो. Bank Loan: आणखी दोन बँकानी कर्जाचे व्याजदर वाढवले; ग्राहकांवर किती अधिकचा भार वाढणार खात्रीशीर परताव्यासाठी एफडीसह अनेक पर्याय जर तुम्हाला फिक्स्ड रिटर्नच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही FD, PPF, NSC आणि पोस्ट ऑफिसच्या मासिक योजनेसह सर्व पर्यायांमध्ये गुंतवणूक करू शकता. यावेळी बँकाही एफडीचे दर वाढवत आहेत. तुम्ही 5 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या FD मध्ये गुंतवणूक केल्यास, तुम्हाला वार्षिक 6 टक्क्यंपर्यंत परताव्यासह कर सूट देखील मिळेल. NBFC च्या FD मध्ये देखील गुंतवणूक करू शकते जिथे परतावा 8 टक्क्यांपेक्षा जास्त अपेक्षित आहे. बाजारातील सततच्या घसरणीच्या या वातावरणात तुम्ही थेट शेअर्समध्ये पैसे गुंतवणे टाळावे, असेही तज्ञांचे म्हणणे आहे. जर बाजार तुमच्यासाठी नवीन असेल तर जास्त जोखीम घेण्याऐवजी तुम्ही म्युच्युअल फंडातून गुंतवणूक करावी.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या