मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Investment Tips: निवृत्तीनंतर मिळतील 3 कोटी रुपये, फॉलो करा या टिप्स

Investment Tips: निवृत्तीनंतर मिळतील 3 कोटी रुपये, फॉलो करा या टिप्स

तरुण वयातच निवृत्तीनंतरची योजना आखणारे नक्कीच (Investment Planning for Retirement) फायद्यात राहतात. महत्त्वाच्या गुंतवणूक टिप्स फॉलो करुन तुम्ही देखील निवृत्तीनंतर सुखात जीवन घालवू शकता.

तरुण वयातच निवृत्तीनंतरची योजना आखणारे नक्कीच (Investment Planning for Retirement) फायद्यात राहतात. महत्त्वाच्या गुंतवणूक टिप्स फॉलो करुन तुम्ही देखील निवृत्तीनंतर सुखात जीवन घालवू शकता.

तरुण वयातच निवृत्तीनंतरची योजना आखणारे नक्कीच (Investment Planning for Retirement) फायद्यात राहतात. महत्त्वाच्या गुंतवणूक टिप्स फॉलो करुन तुम्ही देखील निवृत्तीनंतर सुखात जीवन घालवू शकता.

  • Published by:  Janhavi Bhatkar
मुंबई, 25 डिसेंबर: तरुण वयातच निवृत्तीनंतरची योजना आखणारे नक्कीच (Investment Planning for Retirement) फायद्यात राहतात. महत्त्वाच्या गुंतवणूक टिप्स फॉलो करुन तुम्ही देखील निवृत्तीनंतर सुखात जीवन घालवू शकता. योग्य योजना आखल्यास करोडपती होण्याचे स्वप्न देखील तुम्ही पूर्ण करू शकता. निवृत्तीचे प्लॅनिंग आवश्यक आहे कारण कालांतराने खर्च वाढत जातात. तुम्ही निवृत्तीसाठी वेगळी काही गुंतवणूक करत नसाल तर तुमच्या वृद्धापकाळात भविष्य निर्वाह (Provident Fund) उपयोगी पडेल. त्यामुळे तुमच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा होणाऱ्या पैशांचा आधीच वापर करणे टाळा. पीएफ निधीच्या आधारे सेवानिवृत्तीनंतर सुखी जीवन जगता येते. जमा होईल कोट्यवधींचा निधी जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी नोकरी सुरू केली आणि समजा तुमचा मूळ पगार दरमहा 20,000 रुपये असेल, तर दरमहा तुमच्या पीएफ खात्यात 4800 रुपये जमा होतील. यामध्ये 12 टक्के तुमच्या पगारातील आणि 12 टक्के कंपनीने जमा केलेला निधी असेल. या हिशेबाने एका वर्षात 57,600 रुपये पीएफ खात्यात जमा होतील. आणि सेवानिवृत्तीच्या 35 वर्षानंतर, तुमच्याकडे 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी असेल. त्यावर व्याज मोजले तर हा निधी साडेतीन कोटींच्या आसपास पोहोचेल. सध्या पीएफवर वार्षिक 8.5 टक्के दराने व्याज मिळते आहे. हे वाचा-HDFC Securities ची 'या' शेअरला BUY रेटिंग; 6 महिन्यात 20 नफ्याचा अंदाज ही आकडेवारी केवळ जर पगार 20000 रुपये असेल, पण पगार वाढल्यानंतर पीएफमध्येही वाढ होते. त्यामुळे निश्चितच 25 व्या वर्षी सुरू झालेली ही गुंतवणूक तुम्हाला निवृत्तीनंतर कोट्यधीश बनवेल. तुम्ही गुंतवणूक जेवढ्या उशिरा सुरू कराल तेवढा तुमचा फंड कमी जमा होईल. ईपीएफ गुंतवणूक पूर्णपणे टॅक्स फ्री असते. यामध्ये गुंतवणूक, व्याज आणि पैसे काढण्यावर कोणताही टॅक्स आकारला जात नाही. लक्षात ठेवा या बाबी शक्यतो भविष्य निर्वाह निधीत जमा केलेले पैसे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत काढू नका. कारण एकदा तुम्ही या निधीतील पैसे काढले तर तुमचे निवृत्तीचे नियोजन पूर्ण होणार नाही. पैसे काढून घेतल्याने वृद्धापकाळाची बचत कमी होते. तुम्ही तुमच्या पीएफमधून काही हजार रुपये जरी काढले तरी त्याचा परिणाम निवृत्तीवर अनेक पटींनी होतो. हे वाचा-RBI चा 'या' बँकेला झटका! ठोठावला 30 लाखांचा दंड, राज्यातील 2 बँकांवरही कारवाई नोकऱ्या बदलताना, तुमचे EPF खाते नवीन कंपनीच्या खात्यात हस्तांतरित करण्यास विसरू नका. हस्तांतरण न झाल्यास, नवीन खात्यावर व्याज मिळेल, परंतु जुन्या खात्यावरील व्याज 3 वर्षानंतर थांबेल. तुम्ही UAN द्वारे ईपीएफ खाते अगदी सहजपणे ट्रान्सफर करू शकता.
First published:

Tags: Investment

पुढील बातम्या