Home /News /money /

बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवत आहात? या गोष्टींची नक्की काळजी घ्या

बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवत आहात? या गोष्टींची नक्की काळजी घ्या

FDचा व्याजाचा दर किती आहे ते तपासणं महत्त्वाचं असतं. त्यासोबत प्रत्येक एफडीसाठी व्यजदराचे निकष वेगळे असतात.

    मुंबई, 08 जानेवारी: प्रत्येक जण आपल्य़ा भविष्यासाठी बचत करण्याचा एक उत्तम पर्याय शोधत असतो. फिक्स डिपॉझीट हा त्यातला गुंतवणुकीचा सर्वात सोपा आणि चांगला पर्याय समजला जातो. एक तर आपले पैसे सुरक्षित राहावेत आणि ते वाढावेत असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठीच अनेक जण एफडी म्हणजेच फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणं पसंत करतात. पण बऱ्याचदा आपण कोणताही न विचार करता पैसे गुंतवून मोकळे होतो. तुम्ही थोडासा अभ्यास करून ही गुंतवणूक केलीत तर तुम्हाला फायदा अधिक होऊ शकतो. 1. FDचा व्याजाचा दर किती आहे ते तपासणं महत्त्वाचं असतं. त्यासोबत प्रत्येक एफडीसाठी व्यजदराचे निकष वेगळे असतात. 9 महिन्यांपासून 5 ते 10 वर्षांपर्यंत तुम्हा एफडी ठेवता येते. ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीचा व्याजदर जास्त असतो. ७ दिवस ते १० वर्षांपर्यंत तुम्ही पैसे गुंतवू शकता. १ कोटीच्या एफडी घेतल्या तर बँका जास्त व्याज देतात. 2. अनेक योजना असतात. उदा. सुकन्या योजना, अटल बिहारी वाजपेयी पेन्शन योजना इत्यादी असतात. जास्त चांगला परतावा कुठे मिळतोय पाहाणं गरजेचं असतं. यासोबतच एफडीमध्येही बेस्ट टर्म डिपॉझिट कुठे आहे पाहा. गरज लागल्यास एफडी मोडाव्या लागतात. अशावेळी कुठे जास्त तोटा होणार नाही याचाही विचार करायला हवा. 3. एका पेक्षा अधिक बँक खाती असावीत. एका पेक्षा जास्त खात्यांवर पैसे ठेवावेत. दोन-चार बँकांमध्ये एफडी ठेवावेत. त्यामुळे पैसे गरजेच्या वेळी पटकन पैसे मिळतात. 4. एफडीवर मिळणारं व्याज वेगवेगळ्या प्रकारचं असतं. दर महिन्याला, तिमाही आणि वार्षिक. तुमच्या गरजेप्रमाणे तशी सूचना बँकेला द्यावी. 5. काही बँकांमध्ये एफडी मॅच्युअर होण्याआधी मध्येच काढली तर पेनल्टीचे पैसे द्यावे लागतात. एफडीत पैसे गुंतवण्याआधी ते तपासून पाहावं.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: FD fix deposit, Money

    पुढील बातम्या