Home /News /money /

Investment Tips: फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त परतावा आणि गुंतवणूकही सुरक्षित, चेक करा 'हे' पर्याय

Investment Tips: फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त परतावा आणि गुंतवणूकही सुरक्षित, चेक करा 'हे' पर्याय

तुम्हाला कमी कालावधीत चांगला परतावा हवा असेल तर तुम्हाला तुमची बचत इतर योजनांमध्ये गुंतवावी लागेल. इथे तुमचा धोका वाढेल असे नाही, FD प्रमाणे या योजनांमध्ये तुमचे पैसेही सुरक्षित आहेत.

    मुंबई, 3 मे : भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक (Future Investment Planning) महत्वाची आहे. शेअर बाजारात सतत अस्थिरता असते, अशा स्थितीत गुंतवणूकदारांसमोर अनेकदा असा प्रश्न येतो की, आपला पैसा कुठे गुंतवावा. जिथे त्यांना चांगला परतावा मिळेल आणि त्यांचे पैसेही सुरक्षित असतील. पैसे सुरक्षित असले पाहिजेत यामुळे अनेक लोक त्यांचे पैसे बँकेत एफडी (Bank Fixed Deposit) करतात. परंतु मुदत ठेवींवरील घटत्या व्याजाने तुमचा उद्देश पूर्ण होत नाही. जर तुम्हाला कमी कालावधीत चांगला परतावा हवा असेल तर तुम्हाला तुमची बचत इतर योजनांमध्ये गुंतवावी लागेल. इथे तुमचा धोका वाढेल असे नाही, FD प्रमाणे या योजनांमध्ये तुमचे पैसेही सुरक्षित आहेत. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट (Post Office Time Deposit) पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवू शकता. या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये तुम्हाला एफडीपेक्षा जास्त परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट स्कीम अंतर्गत, 1 ते 3 वर्षे कालावधीच्या गुंतवणुकीवर 5.5 टक्के व्याज उपलब्ध आहे. जर तुम्ही तुमचे पैसे 5 वर्षांसाठी गुंतवले तर हे व्याज 6.7 टक्के होईल. सोनं बनावट किंवा भेसळयुक्त असल्यास कसं ओळखायचं? घरबसल्या 'हे' उपाय करा डेट फंड (Debt Fund) जर तुम्हाला मुदत ठेवीपेक्षा थोडा जास्त परतावा हवा असेल तर तुम्ही डेट फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. डेट फंड हे म्युच्युअल फंडांच्या कॅटगरीपैकी एक आहेत. डेट म्युच्युअल फंड फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात. यामध्ये बाँड, सरकारी रोखे, ट्रेझरी बिले आणि नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर इत्यादींचा समावेश आहे. New IPO : गुंतवणूकदारांना कमाईच्या अनेक संधी, लवकरच 9 कंपन्यांचे आयपीओ येणार डेट फंड कमी जोखमीसह चांगला परतावा मिळवण्यात मदत करतात. कारण म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही सर्वात फायदेशीर मानली जाते. जर तुम्ही व्याजदराची जोखीम घेऊ शकत नसाल तर तुम्ही लिक्विड फंड, अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंड, शॉर्ट ड्युरेशन फंड इत्यादीसारख्या शॉर्ट डेट स्कीममध्ये गुंतवणूक करावी. तुम्ही फंड मॅनेजरच्या मदतीने डेट फंडात पैसे गुंतवू शकता. येथे तुम्हाला मुदत ठेवींपेक्षा जास्त परतावा मिळतो.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Mutual Funds

    पुढील बातम्या