मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Investment Option : छोट्या गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचा नवीन पर्याय, बँकांपेक्षा 2-3 टक्के जास्त रिटर्न

नितीन गडकरी यांनी म्हटलं की, बँकांचे नुकसान करू इच्छित नाही. परंतु लहान गुंतवणूकदारांना बँक एफडीमध्ये जेवढे परतावे मिळतात त्यापेक्षा दोन ते तीन टक्के अधिक परतावा InvIT मध्ये मिळतील. या गुंतवणुकीवर दर महिन्याला व्याजाचा लाभ लोकांना मिळेल.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई,19 डिसेंबर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी छोट्या गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीची संधी घेऊन येत आहेत. नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सांगितले की त्यांचे मंत्रालय बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) सोबत इनव्हिट मॉडेलसाठी (InvIT Model) चर्चा करत आहे. या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त सरकारी अधिकारी इत्यादी लहान ठेवीदारांना त्यांची बचत केंद्र सरकारने सुरू केलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इकॉनॉमिक टाईम्स वेबसाईटच्या एका बातमीनुसार, गडकरी म्हणाले की, गुंतवणूकदारांना InvITs मध्ये गुंतवणूक केल्यास बँकेपेक्षा दोन-तीन टक्के जास्त परतावा मिळेल. ते पुढे म्हणाले की ते त्यांच्या अधिकार्‍यांच्या मागे लागले आहेत आणि ते देखील प्रयत्न करत आहेत आणि ते सेबीची मंजुरी घेतील.

Investment Tips: 29 रुपयांच्या स्टॉकमध्ये कमाईची संधी, तीन महिन्यात 45 टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता

InvIT परतावा बँक FD पेक्षा जास्त

नितीन गडकरी यांनी म्हटलं की, बँकांचे नुकसान करू इच्छित नाही. परंतु लहान गुंतवणूकदारांना बँक एफडीमध्ये जेवढे परतावे मिळतात त्यापेक्षा दोन ते तीन टक्के अधिक परतावा InvIT मध्ये मिळतील. या गुंतवणुकीवर दर महिन्याला व्याजाचा लाभ लोकांना मिळेल.

`या` मल्टिबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल, 1 लाख बनले 91 लाख!

बँकेत व्याजदर कमी होत आहेत

गडकरी पुढे म्हणाले की, सेवानिवृत्त सरकारी अधिकारी आपली बचत बँकेत ठेवतात, त्यावर व्याजदर सातत्याने कमी होत आहेत. देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मोठी समस्या बनली आहे. म्हणूनच मला असे वाटते की जर लहान ठेवीदारांनी InvIT मॉडेलमध्ये गुंतवणूक केली तर त्यांच्या पैशातून पायाभूत सुविधा निर्माण होतील आणि त्यांना चांगला परतावाही मिळेल. या क्षणी आम्हाला देशांतर्गत गुंतवणूकदारांची संख्या आणखी वाढवायची आहे.

First published:

Tags: Investment, Money