Home /News /money /

तुम्हाला Tax वाचवण्यासोबत चांगला परतावा हवाय? तर 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक

तुम्हाला Tax वाचवण्यासोबत चांगला परतावा हवाय? तर 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक

जर तुम्हाला कर (Tax) वाचवण्यासोबत चांगले (Return) परतावे हवे असतील तर इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीममध्ये (Equity Linked Savings Scheme ) गुंतवणूक करा, 1 वर्षात 102% पर्यंत परतावा यावर्षी मिळाला आहे.

    मुंबई, 21 जानेवारी : अनेकांना कर वाचवून चांगली गुंतवणूक करता येते याची माहिती नसते. तुम्ही देखील कर बचत गुंतवणुकीची योजना आखत असाल तर तुम्ही इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (Equity Linked Savings Scheme) मध्ये गुंतवणूक करू शकता. कर वाचवण्यासाठी आणि चांगला परतावा मिळविण्यासाठी कर-बचत म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. या श्रेणीने गेल्या 1 वर्षात 102% पर्यंत परतावा दिला आहे. आज आम्ही तुम्हाला ELSS बद्दल सांगणार आहोत. कलम 80C अंतर्गत कर सूट एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर तुम्ही आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सूट मिळवू शकता. म्हणजेच, तुम्ही 1 आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सूट घेऊ शकता. याशिवाय ELSS मधील गुंतवणुकीवरील नफा आणि रिडम्‍पशन (गुंतवणूक युनिटची विक्री) मधून मिळालेली रक्कम देखील पूर्णपणे करमुक्त आहे. तुम्ही 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता एखादी व्यक्ती सिस्‍टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन (SIP किंवा सीप) द्वारे ELSS मध्ये कमीत कमी 500 रुपयांनी गुंतवणूक सुरू करू शकते. याला कमाल मर्यादा नाही. या फंडांमध्ये गुंतवणूकदारांना दोन प्रकारचे पर्याय मिळतात. पहिली ग्रोथ आणि दुसरी डिव्हिडंड पेआउट. ग्रोथ पर्यायामध्ये पैसे सतत योजनेत राहतात. SBI Alert : एसबीआयची ऑनलाईन सेवा उद्या बंद राहणार, वाचा सविस्तर माहिती 3 वर्षांचा लॉक-इन कालावधी ELSS मध्ये 3 वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो म्हणजेच तुम्ही त्यात गुंतवलेले पैसे फक्त 3 वर्षांनी काढता येतात. हे या योजनेचे एक अतिशय चांगले वैशिष्ट्य आहे. इतर योजनांच्या तुलनेत त्याचा लॉक-इन कालावधी खूपच कमी आहे. वास्तविक लॉक-इन कालावधी संपल्यानंतर गुंतवणूकदार हे चालू ठेवू शकतात. ELSS मध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर मानले जाते. एक लाख रुपयांपर्यंत कर नाही म्युच्युअल फंडातून एका वर्षात मिळणाऱ्या 1 लाख रुपयांपर्यंतचे दीर्घकालीन भांडवली नफा (LTCG) आयकरातून मुक्त आहेत. म्हणजेच तुम्हाला एक लाख रुपयांपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही. या मर्यादेपेक्षा जास्त नफ्यावर 10% दराने कर आकारला जातो. 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांवर पैशाचा पाऊस; 210 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स करबचतीसह चांगला परतावा मिळविण्यासाठी ELSS हा एक चांगला पर्याय वैयक्तिक वित्त तज्ञ आणि ऑप्टिमा मनी मॅनेजर्सचे संस्थापक आणि सीईओ पंकज मठपाल म्हणतात की इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) मधील अनेक फंडांनी गेल्या एका वर्षात 70% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. याशिवाय, तुम्ही आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सूट मिळवू शकता. म्हणूनच चांगला परतावा मिळवण्यासाठी आणि कर वाचवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Investment, Money, Savings and investments

    पुढील बातम्या