Home /News /money /

Indiabulls Housing Finance शेअरमध्ये गुंतवणुकीची संधी, तज्ज्ञांच्या मते किती प्रॉफिट मिळू शकतं?

Indiabulls Housing Finance शेअरमध्ये गुंतवणुकीची संधी, तज्ज्ञांच्या मते किती प्रॉफिट मिळू शकतं?

राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील indiabulls Housing Finance शेअर 'Buy On Dips' धोरणांतर्गत खरेदी करणे शहाणपणाचे ठरेल. तज्ज्ञांचे असे मत आहे की शेअर बाजारात रिव्हर्सन येईल तेव्हा हा शेअर वेगाने धावू शकतो.

    मुंबई, 22 डिसेंबर : इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सच्या (Indiabulls Housing Finance) स्टॉकमध्ये गेल्या काही दिवसांपासून बरीच अस्थिरता दिसून येत आहे. गेल्या 4 ट्रेडिंग सत्रांबद्दल बोलायचे तर ते सुमारे 24 टक्क्यांपर्यंत हा शेअर खाली आला आहे. गुरुवारी, 16 डिसेंबर रोजी शेअरने 279 चा उच्चांक गाठला, पण त्याच दिवशी शेअर 254 रुपयांवर बंद झाला. संपूर्ण शेअर बाजारातही लक्षणीय घसरण झाली. मंगळवारी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स शेअर 218.40 रुपयांवर बंद झाला. शेअर बाजारातील तज्ज्ञ हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. शॉर्ट टर्ममध्ये हा शेअर निगेटिव्ह सेंटिमेंटमुळे घसरला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे, परंतु सध्या त्याचे वॅल्युएशन चांगले दिसते. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील हा शेअर 'Buy On Dips' धोरणांतर्गत खरेदी करणे शहाणपणाचे ठरेल. तज्ज्ञांचे असे मत आहे की शेअर बाजारात रिव्हर्सन येईल तेव्हा हा शेअर वेगाने धावू शकतो. शॉर्ट टर्ममध्ये हा स्टॉक किमान 300 च्या पातळीला स्पर्श करू शकतो. लाख रुपये गुंतवून सुरु करा व्यवसाय; दरमाह होईल बंपर कमाई, सरकारकडूनही मिळते मदत चॉईस ब्रोकिंगचे सुमित बगाडिया काय म्हणतात? चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगाडिया यांनी गुंतवणूकदारांना 'बाय ऑन डिप्स' या धोरणाखाली या शेअरमध्ये प्रवेश घेण्याचा सल्ला दिला आहे. बाय ऑन डिप्स म्हणजे जेव्हा जेव्हा स्टॉकमध्ये घसरण होते तेव्हा ती खरेदी करावी. सुमित बगाडिया म्हणतात की चार्टवर स्टॉक खूप चांगला दिसत आहे आणि ओमिक्रॉनच्या अनिश्चिततेमुळे त्यात घट झाली आहे. बगाडिया यांनी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्ससाठी 275 ते 300 रुपयांचे टार्गेट दिले आहे. डेबिट-क्रेडिट कार्ड वापरण्याची पद्धत 1 जानेवारीपासून बदलणार, काय आहे RBI चे नवीन नियम? स्टॉक 400 रुपयांपर्यंत जाऊ शकतो GCL सिक्युरिटीजचे व्हाईस प्रेसिडंट, रवी सिंघल यांनी देखील स्टॉकवर खरेदीची शिफारसे केली आहे. त्यांनी म्हटले आहे की इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सचा शेअर बाजाराच्या निगेटिव्ह सेंटिमेंट्समुळे घसरला आहे, परंतु त्याचे फंडामेंटल खूप मजबूत आहेत. अल्पावधीत हा स्टॉक 290 रुपयांपर्यंत जाऊ शकतो आणि 3 वर्षांसाठी ठेवल्यास तो 400 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या